
Kasba Peth Election Result : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासीक विजय झाला आहे. तर भाजपचे हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव झाला आहे.
तसेच मतदानाच्या आधी एक दिवस मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही थेट पुणे गाठत मनसेच्या पादाधिकाऱ्यांची बैठक घेत भाजपला मदत करण्याचे निर्देश दिले होते. एवढं सगळं करूनही राज ठाकरे हे भाजपचा पराभव रोखू शकले नाही.
कसबा पोटनिवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पुण्यात तळच ठोकला होता. कसब्याच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लक्ष घातले होते. तसेच प्रचारातही ते सहभागी झाले होते.
मात्र, तरी देखील भाजपचा येथे मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. दरम्यान, भाजच्या दिग्गज नेत्यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात थळ ठोकून आणि राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देऊनही भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.