NCP News : अध्यक्षपदाचा पेच? राष्ट्रवादी काँग्रेसची घटना नेमकं काय सांगते?

Rashtrawadi congress party new president : ...तर समिती प्रभारी अध्यक्षदेखील नेमू शकते!
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

NCP New President : शरद पवार यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. हा राजकीय वर्तुळासह राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का होता. या निर्णयानंतर पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. याचवेळी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचं नाव पुढं आलं आहे. तसेच पवार आपल्या निर्णयावर अद्यापही ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. पण अध्यक्षपदाचा जेव्हा पेच निर्माण होतो तेव्हा पक्षाची घटना महत्वाची जबाबदारी निभावत असते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी 1999 मध्ये केली. हा पक्ष स्थापन करण्यापूर्वी पवार हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्या विदेशी जन्माच्या मुद्दा लावून धरला. या मुद्द्यांवर शरद पवारांनी एक पत्र लिहिलं आणि त्यानंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. ए. संगमा यांना 6 वर्षासाठी काँग्रेसमधून निलंबित केलं. याच बंडातून या पक्षाची स्थापना झाली. यावेळी पक्षाची विशिष्ट घटना तयार केली आहे. महाराष्ट्रासह देशातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा विशेष महत्त्व आहे.

Sharad Pawar News
NCP New President : राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वावर बोलण्यास जयंत पाटलांनी टाळलं ; म्हणाले, " मला बोलवण्याची पक्षाला गरज.."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सदस्यांची समिती स्थापन करावी असं पवार यांनी सुचवलं आहे. समितीमध्ये कोण सदस्य असावेत त्यांची नावेही शरद पवार(Sharad Pawar) यांनी सुचवली आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत 5 मे रोजी बैठक घेणार आहे. पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Sharad Pawar News
Pune District Bazar Samiti : राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्हा जिंकला; पण शहर गमावलं

राष्ट्रवादीच्या घटनेत काय?

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षात प्रत्येकी 3 वर्षांनंतर नव्या अध्यक्षाची निवड होतं असते. आठ महिन्यांपूर्वीच शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. अध्यक्षांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणुक समिती पुढील निर्णय घेते. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणुक समिती निवडणूक घ्यायची की नाही याबाबत चर्चा करेल असं नमूद करण्यात आलं आहे.

...तर समिती प्रभारी अध्यक्षदेखील नेमू शकते!

या दोन्ही समितीला राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता परस्पर चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दोन्ही समितीमध्ये अध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली तर राष्ट्रीय कार्यकारिणीची तात्काळ बैठक बोलवली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता एकमुखी निर्णय घेऊ शकतात. कमिटीला तसा अधिकार देण्यात आला आहे. समिती शिफारस करेल त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत समिती प्रभारी अध्यक्षदेखील नेमू शकते.

Sharad Pawar News
BJP Pune : भाजपने भाकरी फिरवली; कार्यकारिणीत मोठे फेरबदल : काकडे, तापकीर आउट, पांडे इन

अध्यक्षपदाची घोषणा अधिवेशनात ?

राष्ट्रीय अधिवेशन पार पडल्यानंतर अध्यक्षपदाची घोषणा अधिवेशनात केली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणी समितीला विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ पक्ष हितासाठी प्रभारी अध्यक्ष न नेमता थेट अध्यक्ष नेमण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in