अकरावी ‘सीईटी’ची हेल्पलाइन ‘हेल्पलेस’ - Eleventh CET helpline 'Helpless' | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

अकरावी ‘सीईटी’ची हेल्पलाइन ‘हेल्पलेस’

सम्राट कदम : सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

तीन शहरातील विद्यार्थ्यांसह पालकांना आज दिवसभर मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पुणे : अकरावी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई व कोल्हापूरच्या हेल्पलाइनवर प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी या तीन शहरातील विद्यार्थ्यांसह पालकांना आज दिवसभर मोठा मनस्ताप सहन करावा लागला.(Eleventh CET helpline 'Helpless)

 अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने विभागवार संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर करण्यात आले आहे. मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठीची ही परीक्षा २१ ऑगस्टला होणार आहे.दहावी उत्तीर्ण विर्थ्यांना http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. यात येणाऱ्या अडचणींसाठी मंडळाच्या वतीने विभागवार हेल्पलाइन क्रमांक घोषित करण्यात आले आहे.

 ‘सकाळ’ने सर्व विभागांत फोन लावून क्रमांक चालू आहे का नाही, विद्यार्थ्याचे फोन आले का नाही किंवा त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मुंबई आणि पुण्यातील फोन बंद असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी राज्य मंडळाच्या सचिवांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण संबंधित फोन उचलला गेला नाही. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

विषयांच्या निवडीसंदर्भातील अडचणीसाठी आम्ही सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील हेल्पलाइन क्रमांकावर विभागीय मंडळाला फोन लावला. पण क्रमांक नॉट रिचेबल होता. दिवसभर आम्ही प्रयत्न केला पण काही यश आले नाही. शेवटी नागपूरच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला, असा अनुभव पुण्यातील एका पालकाने सांगितला.

हेल्पलाइनच सद्यःस्थिती  
विभागीय मंडळ मोबाईल क्रमांकाची स्थिती  
-  पुणे : क्रमांक बंद
-  नागपूर : क्रमांक चालू, पुण्यातील पालकांचे फोन 
-  मुंबई : क्रमांक बंद 
- औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातुर, कोकण : क्रमांक चालू 
-  कोल्हापुर : क्रमांक बंद
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख