खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार

Dr. Amol Kolhe : हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची माझी मागणीही गडकरी यांनी उचलून धरली आहे.
Dr. Amol Kolhe, Nitin Gadkari)
Dr. Amol Kolhe, Nitin Gadkari)sarkarnama

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न सुरु आहे. यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॅा. अमोल कोल्हे ( Dr. Amol Kolhe) प्रयत्न करीत आहे. (Dr. Amol Kolhe latest news)

हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची डॅा. कोल्हे यांनी केलेली मागणीही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उचलून धरली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या कामाचे नियोजन करण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल नितीन गडकरी यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

डॉ. कोल्हे म्हणाले, "गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न आहे. नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या रस्त्यांच्या कामांबाबत निर्णय सतत बदलले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही बाब गडकरी यांना पत्र पाठवून निदर्शनास आणली होती. या पत्राची दखल घेऊन गडकरी यांनी जलदगतीने निर्णय घेत या सर्व महामार्गांची कामे मार्गी लावली आहेत,"

Dr. Amol Kolhe, Nitin Gadkari)
PMC: पुणे महापालिका विभाजनाबाबत फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या ४ महिन्यात डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे निर्देश कन्सल्टंन्ट संस्थेला देण्यात आले आहेत, तर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या एलिव्हेटेड रस्त्यांसाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या गंभीर अपघाताची दखल घेऊन हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची माझी मागणीही गडकरी यांनी उचलून धरली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या कामाचे नियोजन करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत, असे कोल्हे यांनी सांगितले.

काल (शुक्रवार) केंद्रीयमंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा घेताना चाकणपासून २७ कि.मी. अंतरावर मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कची घोषणा करीत माझ्या सर्वच मागण्यांची पूर्तता केली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने गडकरी यांचे मन:पूर्वक आभारी असल्याची भावना खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in