Nitin Gadkari : पुण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरु होणार..

Nitin Gadkari : चांदणी चौकातला पूल पुढील दोन-तीन दिवसात पाडण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama

पुणे : पुण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज सांगितले. चांदणी चौकातील पुलाची पाहणी केल्यानंतर गडकरी माध्यमांशी बोलत होते. याबाबत आज महापालिका अधिकारी, आणि संबधित अधिकाऱ्यांची गडकरी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

देशात, मुंबईत पहिलीच डबल-डेकर इलेक्ट्रिक एसी बस नुकतीच बेस्टच्या ताफ्यात सामील झाली आहे. अशाच प्रकारची बस पुण्यात सुरु करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, "इलेक्ट्रिक डबलडेकर बस पुण्यात सुरु करण्याचा विचार आहे मात्र इलेक्ट्रिक डबलडेकर बसचा खर्च भरपूर आहे. त्यासाठी विविध पर्याय देखील आहेत. केबलवर जमिनीपासून वर उडणाऱ्या बसेसचा खर्च कमी आहेे. त्याचादेखील विचार करण्याचा प्रयत्न आहे. त्यात दोन प्रकार आहेत. एक बस असेल आणि दुसरी ट्रॉली असेल. मात्र यात अनेक बाबी आहेत. ज्याचा विचार अजून होणं गरजेचं आहे,"

वाहतुकीसाठी अडचणीचा ठरणारा चांदणी चौकातला पूल पुढील दोन-तीन दिवसात पाडण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. हा पूल 30 मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. पूल पाडण्यापूर्वी वाहतूकीचं नियोजन करण्यात येईल. दोन ते तीन तासांसाठी पुलाखालचा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

Nitin Gadkari
INS Vikrant : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका INS विक्रांतच्या पुनर्जन्माची कहाणी जाणून घ्या !

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील अनधिकृतपणे उभे राहिलेले ट्वीन्स टॉवर (Supertech Twin Towers) पाडण्यात आले. केवळ 9 सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली. ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.

आता असाच कंट्रोल ब्लास्टिंगचा अनुभव पुणेकरांना येणार आहे. वाहतूक कोंडीला कारण ठरलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल दहा सेकंदात पाडला जाणार आहे. नोएडातील ट्विन टॉवर पाडलेली संस्था ( चांदणी चौकातील पूल पाडणार आहे...यासाठी पूल आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून (Noida) एक पथक पुण्यात दाखल होणार आहे.

पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीचा वापर होणार आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने हा पूल पाडून दुसरा पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी हा पूल पाडून लवकर कामाला सुरूवात होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in