Elelction | लागा तयारीला! 281 बाजार समित्यांचा निवडणूकांचे बिगुल वाजले

Co-Oprative Eletion |गेल्या अडीच वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे.
Co-Oprative Eletion
Co-Oprative Eletion

कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील 281 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षी 29 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ३० जानेवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. (Elections for 281 Agricultural Produce Market Committees in the state announced)

त्यासाठी बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतचे सदस्य मतदार आहेत. बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते आणि हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार

या सर्व सदस्यांची सूची 27 सप्टेंबर 2022 पर्यंत संबंधित बाजार समित्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तसेच गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदरांची अंतिम यादी सात डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. असे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रियाही सुरु केल्यानंतर औरंगाबाद खंठपीठात एका विकास संस्थेकडून याचिका दाखल केली होती. विकास संस्थांच्या निवडणूका घेतल्याशिवाय समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करू नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्आयाता विकास संस्थांच्या निवडणूका पार पडल्या. त्यानंतर आता न्यायालयाने बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 281 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com