हर्षवर्धन पाटलांनी बाजी मारली; कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध !

पाटील यांना कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा कुटुंबाची नाराजी दूर करण्यातही यश मिळाले आहे.
Harshvardhan Patil-Karmayogi Sugar Factory
Harshvardhan Patil-Karmayogi Sugar FactorySarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन त्यांनी सर्वपक्षीयांना केले होते. त्यानुसार सर्वांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हातभार लावला. (Election of Karmayogi Co-operative Sugar Factory unopposed)

राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढवता कर्मयोगी कारखान्याचा कारभार पारदर्शी नसल्याची टीका सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याने कारखाना पारदर्शी व व्यावसायिक पद्धतीने चालविण्याची मोठी जबाबदारी पाटील यांच्यावर आहे. पाटील यांना कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा कुटुंबाची नाराजी दूर करण्यातही यश मिळाले आहे, ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. त्यासाठी त्यांना पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची मोठी मदत झाली आहे.

Harshvardhan Patil-Karmayogi Sugar Factory
आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते : देवेंद्र फडणवीस

या निवडणुकीत २१ जागांसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलचेच २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणूक कार्यक्रमानुसार याची अधिकृत घोषणा ही २२ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील व तालुका सहायक जिजाबा गावडे यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध झाल्याने पाटील यांची कारखान्यावरील सत्ता अबाधीत राहिली आहे. त्याचा फायदा त्यांना राजकीय पाठबळ वाढण्यास निश्चित होणार आहे. मात्र, त्यांनी कारखान्याचे अर्थकारण पुन्हा रुळावर आणत राज्यातील पहिल्या दहा कारखान्यांत कर्मयोगी आणण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची अपेक्षा पाटील यांच्याकडून कर्मयोगीच्या सभासद शेतकरी बाळगून आहेत.

Harshvardhan Patil-Karmayogi Sugar Factory
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावर संग्राम जगताप काय भूमिका घेणार?

गटनिहाय बिनविरोध झालेले कर्मयोगी कारखान्याचे संचालक पुढील प्रमाणे : इंदापूर गट- भरत शहा, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे. कालठण गट- हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे. शेळगाव गट- बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे. भिगवण गट- पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड. पळसदेव गट- भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर. महिला राखीव-शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम. अनुसूचित जाती जमाती- केशव दुर्गे. इतर मागास प्रवर्ग- सतीश व्यवहारे. भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग- हिरा पारेकर. ब वर्ग प्रतिनिधी- वसंत मोहोळकर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com