Indapur News : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर थेट परिणाम होतो.
Chhatrapati Sugar Factory
Chhatrapati Sugar FactorySarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश पुण्याच्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून लांबलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. (Election of Chhatrapati Sugar Factory in Indapur taluka has started)

भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा इंदापूर (Indapur) तालुक्याच्या राजकारणावर थेट परिणाम होतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी छत्रपती कारखान्याची निवडणूक महत्वाची आहे. कारखान्याचे संचालक होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. छत्रपती साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे बारामती आणि इंदापूर तालुका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दृष्टीने या कारखान्याची निवडणूक महत्वाची आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, साखर संघाचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या विरोधात उभे ठाकणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

Chhatrapati Sugar Factory
Solapur Loksabha : सोलापूर राष्ट्रवादीकडे घ्यायचा तर ‘या’ तीन मतदारसंघाची माहिती काढा : पवारांचा आदेश

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्‍याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १० मे २०२० रोजी संपली होती. त्यावेळी निवडणूक याद्या सादर करुन प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्या याद्यांवर हरकती घेऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कारखान्याची निवडणूक रखडली होती. उच्च न्यायालयाने २१ एप्रिल रोजी ती याचिका निकाली काढून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला आहे.

Chhatrapati Sugar Factory
Bawankule Vs Thackeray : उद्धव ठाकरेंचा त्याच दिवशी पराभव झाला होता : बावनकुळेंचा टोला

यासंदर्भात १० मे रोजी प्रादेशिक सहसंचालकाने छत्रपती कारखान्याने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्याचा आदेश दिला आहे. त्या याद्या तयार करताना १ मे २०२३ ची सभासद संख्या विचार घेण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २६ व २७ मध्ये २८ मार्च २०२२ मध्ये झालेली सुधारणा तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१, महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) २०१४ च्या उपविधीतील तरतुदीचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com