Khed Bazar Samiti: खेड बाजार समितीचे कारभारी अजितदादा ठरवणार

Pune Politics: खेड बाजार समितीची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली होती.
Khed Bazar Samiti
Khed Bazar SamitiSarkarnama

पिंपरी : खेड (जि.पुणे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक येत्या बुधवारी (ता.२४)होणार आहे. त्यात स्वत: अजित पवार यांनी लक्ष घातले असून तेच उमेदवार ठरवणार आहेत. त्यामुळे या पदावर दोन जुन्या की आठ नव्या संचालकांपैकी कुणाला संधी मिळते? याची उत्सुकता संपूर्ण खेड तालुक्याला लागली आहे.

ही निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते-पाटील यांच्या श्री.भीमांशकर शेतकरी सहकारी पॅनेलला बहुमत मिळालेले आहे. त्यांनी १८ पैकी दहा जागा जिंकलेल्या आहेत.

त्यामुळे सहा जिंकलेले विरोधी सर्वपक्षीय श्री.भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेल उमेदवार देण्याची शक्यता नाही. हात दाखवून कशाला अवलक्षण करून घ्यायचं, अशी प्रतिक्रिया या पॅनेलमधील सामील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने 'सरकारनामा'ला आज दिली.

Khed Bazar Samiti
Demonetization of 2000 Note : दोन हजार रुपयांची नोटबंद; बँक दिवसाला स्वीकारणार 'इतकी' रक्कम

दरम्यान, आमदार मोहिते यांनी या निवडणुकीबाबत अजित पवार यांच्याशी आज सकाळी डीपीडीसीची बैठक सुरु होण्यापूर्वी पुण्यात चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्वांशी बोलून उमेदवार ठरवू, असे सांगितले. तर, आमदार असल्याने आपण सभापतीपदाची निवडणूक लढविणार नसून तेथे माझ्या कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचे त्यांनी अजितदादांच्या भेटीनंतर 'सरकारनामा'ला सांगितले.

तसेच दरवर्षी सभापती, उपसभापतीपदी करून निवडून आलेल्या सर्व संचालकांना संधी देणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्यामुळे आता फक्त निवडून आलेले दोन जुने वा नव्या आठपैकी कुठल्या संचालकांची पहिल्या वर्षी सभापती आणि उपसभापतीपदी निवड होते, याचीच उत्सुकता आहे.

Khed Bazar Samiti
RBI Big Announcement: मोदी सरकारची दुसरी नोदबंदी; एक ऑक्टोबरपासून दोन हजाराची नोट होणार कागदाचा तुकडा

बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जुन्नर सचिन सरसमकर यांनी आज या सभापती, उपसभापती निवडणुकीबाबत माहिती दिली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात ती घेणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता ही निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. अर्जवाटप, स्वीकृती, छाननी, माघार, आवश्यकतेनुसार मतदान आणि निकाल ही सर्व प्रकिया दोन तासांत पार पडणार आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली खेड बाजार समितीची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. कारण राज्यात हाडवैरी असलेल्या दोन्ही शिवसेना आणि भाजप, काँग्रेसने, आमदार मोहितेंविरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल दिले होते. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला मतदान झाले.

दुसऱ्या दिवशी निकाल आला. सर्वपक्षीय पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. तर आमदार मोहितेंच्या पॅनेलने बहूमत मिळवले. त्यांनी सत्ता कायम राखली. १८ पैकी दहा जागा जिंकल्या. नंतर आणखी एक संचालक त्यांना येऊन मिळाले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com