Baramati Loksabha : मुख्यमंत्र्यांकडून विजय शिवतारेंना ताकद : बारामती लोकसभेची दिली ही जबाबदारी

राज्यातील सत्तांतरानंतर शिवतरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेचा फायदा घेत बारामती लोकसभा मतदारसंघावरत लक्ष केंद्रित केले आहे.
Vijay Shivtare-Eknath Shinde
Vijay Shivtare-Eknath ShindeSarkarnama

माळशिरस (जि. पुणे) : शिवसेना नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात पक्ष विस्तारासाठी पाऊल उचलले आहे. लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नेमताना बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या (Lok Sabha Constituency) संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यावर सोपवली. या मतदारसंघात शिवतारेंना ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. (Election of Baramati Lok Sabha Constituency Liaison Pramukhdi Vijay Shivtare)

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला पुरंदरचे आमदार आणि राज्यमंत्री असताना विजय शिवतारे यांनी कायम पवार कुटुंबीयांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिवतरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेचा फायदा घेत बारामती लोकसभा मतदारसंघावरत लक्ष केंद्रित केले आहे. शिंदे गटाच्या मजबुतीबरोबरच पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विश्वास दाखवत शिवतारे यांना ताकत ताकद देण्याच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन मतदारसंघ आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न शिवतारेंकडून होऊ शकतो.

Vijay Shivtare-Eknath Shinde
Satej Patil News : आमदार सतेज पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल आणि भीमराव तापकीर या सहयोगी पक्षातील नेत्यांबरोबर जुळून घेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आवाहन देण्याचा प्रयत्न शिवतारे करणार, हे निश्चित मानले जाते.

Vijay Shivtare-Eknath Shinde
Kasba By Election Result : गिरीश बापट सक्रीय राजकारणातून बाजूला होताच भाजपचा बुरूज ढासळला

सर्व तालुक्यांना न्याय देण्यासाठी लोकसभा लढणार : शिवतारे

या निवडीनंतर विजय शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, खडकवासला, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुके येतात. पण सर्व तालुक्यांची मतं घेऊन केवळ बारामती तालुक्यात विकासकामे केली जात आहेत. सर्व तालुक्यांना समन्याय मिळावा, यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने एक होऊन बदल घडवणं आवश्यक आहे. मी स्वतः त्यासाठी पर्याय म्हणून समोर येणार आहे, असेही विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com