महाआघाडीत असा आहे पेच : अजितदादा, संजय राऊत आणि थोपटेंचीही कसोटी!

भोर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे.
Ajit Pawar_Sanjay Raut_Sangram Thopte
Ajit Pawar_Sanjay Raut_Sangram ThopteSarkarnama

भोर (जि. पुणे) : महाविकास आघाडीतील नेत्यांना एका अनोख्य पेचप्रसंगाला भोर तालुक्यात समोरे जावे लागणार आहे. भोर पंचायत समितीमध्ये सध्या महाविकास आघाडीतील पक्षांचे म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे एकेक सदस्य आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. १६ नोव्हेंबर) होणाऱ्या सभापती निवडीत कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा, असा तो पेच असणार आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे कारभारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांची हा पेच सोडवताना कसोटी लागणार आहे. खेडमध्ये सभापतिपद गमावावे लागल्याने राऊत या ठिकाणी आपला सभापती बसविणार की अजित पवार पुन्हा सत्ता कायम राखणार, हे पाहावे लागणार आहे. यामध्ये आमदार थोपटे यांची भूमिका मात्र निर्णायक असणार आहे. (Election for the post of sabhapati of Bhor Panchayat Samiti on Tuesday)

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १६ नोव्हेंबर) येथील सभापती निवडीची निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात एकत्र असलेले पण, तालुक्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे पक्ष कोणाला पाठिंबा देणार किंवा कोणाचा घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Ajit Pawar_Sanjay Raut_Sangram Thopte
सुप्रिया सुळे, आमदार जगताप यांचा वीजबिलासाठी असाही पुढाकार : एक कोटीच्या मदतीची घोषणा

भोर पंचायत समितीची एकूण सदस्यसंख्या सात असून राष्ट्रवादीच्या तिकीटावर चार जण निवडून आले होते, तर काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. मागील सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बजावलेल्या व्हीपचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सभापती दमयंती जाधव यांच्यासह श्रीधर केंद्रे व मंगल बोडके यांचे सदस्यत्व रद्द केले होते, त्यामुळे पक्षाची पंचायत समितीमधील सत्ता दोलायमान अवस्थेत आहे. सद्यस्थितीत पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामध्ये विद्यमान उपसभापती राष्ट्रवादीचे लहू शेलार, काँग्रेसचे रोहन बाठे आणि शिवसेनेच्या पूनम पांगारे ह्या सदस्यांचा समावेश आहे. सभापतिपदाच्या निवडीसाठी यातील कोण कोणाला मदत करणार, हा औत्सुक्याचा विषय आहे.

Ajit Pawar_Sanjay Raut_Sangram Thopte
विठ्ठल कारखान्याला यापूर्वी दिलेल्या पैशाचे काय झालं : अजितदादांचा भगिरथ भालके, संचालकांना सवाल

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा एकेक प्रतिनिधी आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत कोण कोणाला मदत करणार, हे सांगणे कठीण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, राष्ट्रवादी-शिवसेना की काँग्रेस शिवसेना यापैकी कोण एकत्र येऊन सभापती व उपसभापती ठरविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान उपसभापती लहू शेलार ह्यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे.

सभापतिपदासाठी मंगळवारी (ता.१६ नोव्हेंबर) निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी राजेंद्रकुमार कचरे हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. बारापर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर साडेबारापर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यानंतर पाहुणे पावणे एक वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com