Pune APMC : मतदानासाठी काही तास शिल्लक असताना, पुणे बाजार समितीला नव्याने मतपत्रिका छापण्याचे आदेश

Pune News : पुणे बाजार समिती निवडणूक; नियम ३८ चे पालन करण्याची सूचना
APMC
APMCSarkarnama

Pune APMC Election : पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना नव्याने मतपत्रिका छापण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीसाठी मतपत्रिका छापताना नियम क्रमांक ३८ चे पालन करावे, तसेच उमेदवार यादीच्या क्रमाप्रमाने मत पत्रिकेवर छापण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.पी. एल. खंडागळे यांनी पुणे बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

APMC
PCMC News : पालिकेला सूचले उशिराचे शहाणपण; पाच बळी गेल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

पुणे बाजार समिती (Pune APMC) निवडणूकीमध्ये व्यापारी आडते मतदार संघामधून २ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रमानुसार २१ एप्रिल रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले. त्यानंतर १२ उमेदवारांची चिन्हांसह यादी एका खाली एक या क्रमवारीप्रमाणे जाहीर केली. मात्र, प्रत्यक्षात मतपत्रिका वेगळी छापल्याचे आढळले.

APMC
APMC Election in State : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान

आता चिन्ह वाटपाच्या दिवशी ज्या प्रमाणे यादी प्रसिद्ध केली त्याप्रमाणे एका खाली एक बारा उमेदवारांची नावे असणारी मतपत्रिका छापली जावी. अन्यथा सर्व उमेदवार उपोषणास बसतील, असा इशारा व्यापारी आडते मतदारसंघातील उमेदवार सौरभ कुंजीर, शिवाजी सुर्यवंशी यांच्यासह इतर उमेदवारांनी दिला होता. त्यावर निवडणूक प्राधिकरणाने आदेश काढले. (Pune News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in