एकनाथ शिंदेंचा ताफा पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकला अन्...

CM Eknath Shinde | गुरुवारी (25 ऑगस्ट) विधिमंडळाच्या अधिवेशनातही पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
Eknath Shinde's convoy got stuck in a traffic jam in Pune
Eknath Shinde's convoy got stuck in a traffic jam in PuneSarkarnama

पुणे : मुंबईप्रमाणे आता पुण्यातही वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसल्याचे दिसले.शुक्रवारी (27 ऑगस्ट) रात्री पुण्यातील चांदणी चौक परिसरामध्ये उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि याच कोंडीत थेट मुख्यमंत्रीही अडकले. (Eknath Shinde's convoy got stuck in a traffic jam in Pune)

विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांचाच ताफा अडकल्याचे पाहिल्यावर स्थानिकांनी संधी साधत शिंदेंकडे तक्रार केली. एकनाथ शिंदे यांनीदेखील तातडीने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. दोनच दिवसांपूर्वी गुरुवारी (25 ऑगस्ट) विधिमंडळाच्या अधिवेशनातही पुण्यातील विद्यापीठ चौक आणि चांदणी चौकातील रेंगाळलेले मेट्रोचे काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पुणेकरांना होणारा त्रास याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट या विषयावरुन मुख्यमंत्र्यांचा ताफाच स्थानिकांनी अडवत त्यांच्या समस्या सांगितल्या.

Eknath Shinde's convoy got stuck in a traffic jam in Pune
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या कारणासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटले

वाहतूक कोंडीच्या समस्या, स्थानिकांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पुण्याच्या आयुक्तांना स्पॉटवर भेटण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ताफा वाहतूक कोंडीत अडकल्याने मुख्यमंत्री शिंदे हे गाडीमधून उतरुन रस्त्याच्या बाजूला येऊन उभे राहिले. मुख्यमंत्रीच समोर दिसल्याने तेथील काही स्थानिकांनी त्यांच्याकडे अशी वाहतूक कोंडी रोजचा प्रकार झाल्याची तक्रार केली. जवळपास१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुख्यमंत्र्यांचा ताफा एकाच जागी अडकल्याने स्थानिकांनाही त्यांच्या समस्या मांडता आल्या.

विधिमंडळातील चर्चेवेळी पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सरकारने याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्र्याचाच ताफा अडकल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी होत असणाऱ्या ठिकाणी शनिवारी भेटण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांसमोरच अधिकाऱ्यांना फोन लावला आणि उद्या आयुक्त या कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगत संबंधित ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले.

पुण्याचे पोलीस आयुक्त (वाहतूक) आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा ताफा साताऱ्याच्या दिशेने जाताना हा प्रकार घडला. मुंबई-बंगळुरु माहामार्गावर चांदणी चौकाजवळ एक ट्रक आणि कार बंद पडल्याने दोन रस्ते बंद झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफाही या ठिकाणी अडकला.वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत ताफ्यासाठी वाट मोकळी करुन दिली.दरम्यान, पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडल्याने आता तरी यातून सुटका होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com