आढळराव पाटलांनी बोलावले पण मुख्यमंत्री वळसे पाटलांनाही भेटले...

Eknath Shinde हे आज भीमाशंकरच्या दर्शनासाठी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Eknath Shinde-Dilip Walse Patil
Eknath Shinde-Dilip Walse Patilsarkarnama

पुणे : ज्यासाठी अट्टहास केला नेमके त्याच्याच उलटे घडावे, अशी परिस्थिती आज आंबेगाव तालुक्यात झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या त्रासाला (खरे तर वळसे पाटलांच्या) कंटाळून शिवसेना सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) गेले. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले. मुख्यमंत्री हे भीमाशंकरच्या दर्शनाला येण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्याही निवासस्थानी भेट द्यावी, अशी विनंती आढळरावांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य देखील केली. पण आढळरावांच्या घरी जाण्याच्या आधी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी भेटले आणि तेथेच चर्चा सुरू झाली. राजकीय पटलावर या भेटीचे पडसाद उमटले नाही तरच नवले. (Eknath Shinde visits Dilip Walse Patil`s home)

भीमाशंकर येथे दर्शनासाठी शिंदे आज सायंकाळी मंचर येथे आले. तेथे जाण्यापूर्वी ते लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या बंगल्यावर जाणार होते. तेथे ते भोजनही करणार असल्याची माहिती आढळराव पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली होती. त्यामुळे सर्व पत्रकार लांडेवाडी येथेच होते. पण अचानकपणे दौऱ्यात बदल झाला आणि मुख्यमंत्री हे थेट वळसे पाटील यांचे निवासस्थानी आले. नंतर त्यांनी व ळसे पाटील यांच्या समवेत नाश्ताही घेतला. पण नेमकी आत काय चर्चा झाली याविषयी मात्र माहिती उपलब्ध झाली नाही.

मंचर शहरात फटाक्याची आतषबाजी करत शिंदे गट शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत या वेळी करण्यात आले. भाजपच्या नेत्या आशा बुचके, संजय थोरात, विजय पवार, जयसिंग एरंडे, शिवसेनेचे अरुण गिरे, सुनील बाणखेले यांच्यासह हजारो कार्यकर्ते रस्त्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मुख्यमंत्र्यासोबत त्यांच्या पत्नी आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in