पुणे दौऱ्यात एकनाथ शिंदे शिवसेनेला आणखी धक्के देणार का?

एकनाथ शिंदे १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर; महाआरती, मैदानाच्या उद्‌घाटनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे येत्या १ ऑगस्ट रोजी पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच पुणे दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते फुटबॉल मैदानाचे उद्‌घाटन करणार आहेत. तसेच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आता शिंदे समर्थकांचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे शिवसेनेला आणखी धक्के देणार का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. (Eknath Shinde on 1st August visit to Pune)

शिवसेनेतील आऊटगोईंग रोखण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. त्यांच्या सभांना चांगली गर्दीही होत आहे. ते आपल्या सभांमधून बंडखोरांवर सडतोड शब्दांत टीकास्त्र सोडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनीही राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्याचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदे हे येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Cm Eknath Shinde
राष्ट्रवादीला मोठा धक्का : बबनदादा शिंदे, राजन पाटलांनी घेतली दिल्लीत फडणवीसांची भेट

मुख्यमंत्री शिंदे हे एक ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता हांडेवाडी येथे फुटबॉल मैदानाचे उद्‌घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झालेले माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वखर्चातून हे फुटबॉलचे मैदान उभारलेले आहे. त्यातच भानगिरे यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने समर्थकांच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची हजेरी महत्वाची मानली जात आहे.

Cm Eknath Shinde
मोठी बातमी : इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले; पायलट युवती जखमी

दरम्यान, एक ऑगस्ट रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या दौऱ्यात इतरही अनेक कार्यक्रम असणार आहेत. त्या शिवाय ते शिवसेनेला पुण्यात आणखी धक्का देणार का, याचीही उत्सुकता या दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच पुण्यात जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत, त्यामुळे त्यांच्या समर्थकांना या दौऱ्याची प्रतीक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in