त्यादिवशी शिंदे साहेब शेवटपर्यंत माझ्यासोबत; तेच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक : उदय सामंत

Uday Samant | Eknath Shinde | : सामंत यांनी शिंदे यांचा भावनिक प्रसंग महाराष्ट्रासमोर आणला
Uday Samant, Eknath shinde
Uday Samant, Eknath shindesarkarnama

पुणे : शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्यावरील हल्ल्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Eknath Shinde) यांच्या दरम्यानचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पण याच हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक हळवे आणि काळजी करणारे रुप बघायला मिळाले असल्याचे स्वतः उदय सामंत यांनी सांगितले आहे. सामंत यांनी ट्विट करुन हा शिंदे यांच्याशी संबंधित ही घटना सांगितली आहे. (Eknath Shinde | Shivsena Latest News)

परवा माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझे मेडिकल चेकअप दीनानाथ मंगेशकर येथे झाले त्यावेळी मा. मुख्यमंत्री शिंदेसाहेब तिथे होते. रात्री १.१५ पर्यंत म्हणजेच माझं चेकअप पूर्ण होईपर्यंत ते थांबले. नंतर त्यांच्या गाडीतून मला त्यांनी सोबत आणलं, ह्याला म्हणतात खरा मा.बाळासाहेबांचा शिवसैनिक, असे ट्विट करुन सामंत यांनी शिंदे यांचा भावनिक प्रसंग महाराष्ट्रासमोर आणला आहे.

पोलिसांकडून ६ जणांना अटक :

दरम्यान सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद यात्रा' सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार अशा ६ जणांना अटक केली आहे. याशिवाय या हल्ल्याला चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनाही अटक करण्यात आली आहे. सोबतच १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

मंगळवारी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री आणि अन्य आमदार कोंढवा रस्त्यावरून आमदार तानाजी सावंत यांच्या सातारा रस्त्यावरील निवासस्थानी आले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आमदार सामंत यांची मोटार होती. मात्र, ही मोटार ताफ्यात काहीशी मागे राहिली. कात्रज चौकात ही मोटार येताच शिवसैनिकांच्या एका गटाने मोटारीवर हल्ला केला. काहीवेळापूर्वीच कात्रज चौकात आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती.त्यामुळे काही शिवसैनिक अजून त्या ठिकाणी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in