खुद्द शिक्षणमंत्री येणार वाबळेवाडीत; 'सीईओ आयुष प्रसाद यांनांही दिला आदेश!

Deepak Kesarkar : प्रोत्साहनऐवजी त्रास दिला जात असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही...
Deepak Kesarkar Latest News
Deepak Kesarkar Latest NewsSarkarnama

शिक्रापूर : ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभ्या राहिलेल्या जागतिक दर्जाच्या वाबळेवाडी शाळेवर बहिष्काराची वेळ आणणा-या पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लवकरच शाळेवरील बहिष्कार मागे घेण्यासाठी स्वत: वाबळेवाडीत येत असल्याचे आजच्या मुंबई येथील बैठकीत सांगितले.

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने आज झालेल्या तातडीच्या बैठकीत मंत्री केसरकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना समज दिली व आपल्या वाबळेवाडे दौ-यावेळी आयुष प्रसाद यांना हजर राहण्याचा आदेशही दिला. (Deepak Kesarkar Latest News)

Deepak Kesarkar Latest News
पुण्यातल्या पावसावरून दोन दादांमध्ये जुंपली...

शुक्रवारी (ता.१४ ऑक्टोबर) वाबळेवाडी शाळेतील सर्व पालकांनी एकत्र येवून शाळेवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. शाळा उभारणी केलेल्या मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे सव्वा वर्षांपूर्वी केलेल्या निलंबनानंतर ग्रामस्थांवर कारवाई करायला निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शाळा बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी (ता.१७ ऑक्टोबर) माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तातडीने वाबळेवाडीत ग्रामस्थांची बैठक घेवून तेथूनच शिक्षणमंत्री केसरकर यांची बैठक आज (ता.१८ऑक्टोबर) लावली होती.

संध्याकाळी सात ते रात्री नऊपर्यंत झालेल्या या बैठकीत केसरकर यांनी वाबळेवाडीकरांकडून सर्व माहिती घेतली व प्रशासनाची बाजु जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांचेकडून फोनवर समजून घेतली. यावेळी त्यांनी लोकवर्गणी आणि वेगळे उपक्रम शाळांना प्रोत्साहनऐवजी त्रास दिला जात असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे थेट सांगितले. या शिवाय शासकीय कर्मचारी यांचे प्रतिनिधी म्हणून सीईओ आयुष प्रसाद हे असताना त्यांनी शाळेत न येताच कारवाया सुरू करणे यामुळे आपण त्यांचेवर प्रचंड नाराज असल्याचे त्यांना तात्काळ कळविण्यास सांगितले.

Deepak Kesarkar Latest News
दाऊद, हाफीजवरील प्रश्नावर पाकिस्तानवर आली तोंड लपविण्याची वेळ!

दरम्यान राज्यातील शाळांसाठीची प्रेरणा-शाळा असलेली वाबळेवाडी शाळा पालकांकडूनच बहिष्कृत होणे याचे पुणे जिल्हा परिषदेला काही देणे-घेणे नसेल पण आम्ही सरकार म्हणून या प्रश्नी गंभीर असल्याने सदर शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि शाळेतील सर्व प्रश्न जागचे जागेवरच मिटविण्यासाठी आपण ऐन दिवाळीत किंवा दिवाळी नंतर लगेच वाबळेवाडीत येत असल्याचे त्यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.

वाबळेवाडी शाळेबाबत केसरकर यांनी आपल्यासह ग्रामस्थ सतीश वाबळे, अंकुश वाबळे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, सरपंच रमेश गडदे यांचेकडून माहिती घेतली असून सदर माहिती शिक्षण सचिवांकडे तात्काळ पाठविल्याचे आढळराव-पाटील यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, रोहिदास शिवले, अण्णासाहेब हजारे, दत्ता गिलबीले, सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, मोहिनी मांढरे,शालन राऊत ,उषाताई राऊत, माजी सरपंच भगवानराव वाबळे, ग्रामस्त अंकुश वाबळे, पप्पू वाबळे, सतीश कोठावळे,अविनाश मासळकर, मोहन घोलप आदी उपस्थित होते.

Deepak Kesarkar Latest News
सोन्यासारखा माल पण कमीमध्ये चाललायं.. भुजबळांनी भाव वाढवत लिलाव गाजवला...

दरम्यान, राज्यासाठी भूषनावह शाळेत एकदाही भेट न देता कारवाई करणा-या व तक्रारदार जिल्हा परिषद सदस्यांचा पाहुणचार घेणा-या सीईओ आयुष प्रसाद यांच्याबाबत केसरकर यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आणि ग्रामस्थांना सांगितले की, आत्तापर्यंत ते आले नाहीत तर नाही येवूद्या, मी वाबळेवाडीत आल्यावर तरी त्यांना शाळेत यावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com