
पुणे : मागील काही काळापासून अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडी(ED)च्या कारवाया वाढलेले आहेत. ईडीची धाड आता पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर पडली आहे. या व्यावसायिचावर कारवाईचा बडगा उचलण्यात आले आहे. पुणे शहरातील ईडीच्या या कारवाईमुळे शहरात याची जोरदार चर्चा होती.
पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच (ईडी)ने शुक्रवारी छापा टाकला आहे. हडपसर परिसरातील महम्मदवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. यामुळे आता या कारवाईची दिवसभर शहरात चर्चा होती.
संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील कल्याणीनगर, येरवडा, महम्मदवाडी, एनआयबीएम रस्ता आणि वानवडी भागात मोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. ईडीच्या मुंबई पथकाकडून ही कारवाई केली. ईडीच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकाची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी केली. तसेच, काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.