ED Action : ईडीची पुण्यात मोठी कारवाई; रोझरी स्कूलचे संचालक आर्‍हानाला अटक

ED News : पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना यांना ईडीने अटक केली आहे.
Vinay Arhana, ED
Vinay Arhana, ED Sarkarnama

Pune News : पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना ( Vinay Aranha) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. न्यायालयाने विनय आर्‍हाना यांना 20 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आर्‍हानांच्या अटकेमुळे पुण्यातील (Pune News) शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कॉसमॉस बँकेकडून (Cosmos Bank) आर्‍हानाने चुकीच्या पध्दतीने कर्ज घेतले. शाळांच्या नुतणीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाव्दारे मिळालेल्या पैशाचा उपयोग आर्‍हानाने हायफाय लाईफस्टाईल साठी केला. तसेच बॉलीवूडमधील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Vinay Arhana, ED
Jalgaon District Bank : संजय पवारांनी डाव टाकला, आघाडीला थांगपत्ताच नाही : मतदान झाल्यावरच बिंग फुटले

अंमलबजावणी संचालनायाकडून सुरू असलेला तपासात या बाबी समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाइी आर्‍हानाची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. ईडीने अटक करून आर्‍हानाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Vinay Arhana, ED
Hasan Mushrif News : साडेनऊतासांच्या चौकशीनंतर मुश्रीफांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश!

पीएमएलएच्या तरतुदीनुसार नोंदवलेल्या जबाबांसह तपासाचा मोठ्या नोंदी मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर गुन्हयात आर्‍हानाचा सहभाग दर्शवित असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. ईडीने आर्‍हानाच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आर्‍हानाला 10 दिवसांची कोठडी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com