ED summons to Chandrakant Gaikwad: मुश्रीफांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ईडीचे समन्स

Pune ED Raid News Update: पुण्यातील व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालय अशा 9 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली .
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

Hasan Mushrif News Update : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत मधुकर गायकवाड यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचारप्रकरणी ईडी (ED) चौकशी करण्यासाठी ईडीने गायकवाड यांना बुधवारी (०५ एप्रिल) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.

Hasan Mushrif
Thackeray-Fadanvis News: संजय राऊतांनी भाजप -शिवसेनेच्या घोटाळेबहाद्दरांची यादीच फडणवीसांना पाठवली : पहा कोण आहेत ते नेते

काल ईडीने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या जवळच्या आणि व्यावसायिक भागीदाराच्या कार्यालयात आणि घरावर अनेक तास शोधमोहीम राबवली. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मनी लॉण्ड्रिग प्रकरणााशी संबंधित असलेल्या काही व्यवसायिकांच्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आली. यात विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया या व्यवसायिकांच्या कार्यलयात ईडीने कारवाई केली.

पुण्यातील व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालय अशा 9 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली . काल पहाटेपासूनच मुंबईतील ईडीच्या पथकाने व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थांवरही धाड टाकत तपास सुरु केला. याशिवाय पुण्यातील हडपसर, गणेश पेठ, प्रभात रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली.

Hasan Mushrif
Sanjay Shirsat On Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका, माझ्यासासाठी तो विषय संपला..

हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानसे जाणाऱ्या चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली. दरम्यान गेल्या महिन्यातही  ईडीने गायकवाड यांच्या कार्यालयात छापेमारे केली होती. या कारवाईत ईडी त्यांच्या कार्यालयातून काही कागदपत्रे जप्त केली होती. तसेच गायकवाडांची चौकशी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com