बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुख्य कार्यालयावर ED चे छापे

भोसले यांच्यामागे ईडीच्या कारवाईचा दंडुका गेली काही महिने सुरू आहे..
avinsh-bhosale-ff
avinsh-bhosale-ff

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे नसून त्यांच्या उद्योगसमूहाच्या (एबीआयएल) मुख्य कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालायने (ED) आज सकाळी छापे टाकले. त्यांच्या मुख्यालयातील कागदपत्रांची झाडाझडती ईडीचे अधिकारी घेत आहेत. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ही तपासणी सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये स्वतः भोसले हे ईडीच्या मुंबई कार्यालयातून बाहेर पडताना दिसून आले होते. त्यांची तेव्हा दहा तास चौकशी केली होती. तेव्हापासून ईडी त्यांच्याविरुद्ध तपास करत असल्याचे स्पष्ट झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच पत्नी आणि मुलगी यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिलेले होते. त्याबाबत ईडीने अधिकृतरित्या काही सांगितलेले नव्हते. सुमारे सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांच्या रकमेचा स्त्रोत ईडी शोधत असल्याची चर्चा आहे. प्राप्तिकर विभागानेही याबाबत छापे या आधी टाकले होते.

भोसले हे हाॅटेल आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून राज्यात परिचित आहेत. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे म्हणूनही त्यांची ओळख आहे. राज्यातील जवळपास प्रत्येक राजकीय पक्षांतील प्रमुख  नेत्यांशी त्यांची ओळख आणि ऊठबस आहे. कृष्णा खोरे प्रकल्पातील प्रमुख ठेकेदार म्हणून भोसले यांनी आपला जम बसविला होता. त्यानंतर त्यांनी अनेक सरकारी प्रकल्पांची कामे घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com