राज्यातील हजारो मराठी शाळा बंद करण्याचा ईडी सरकारचा घाट : अजित पवारांचा आरोप

मी तसा शिस्तीचा कडक आहे, चुकलं तर माझ्या जवळच्यालाही चुकलंच म्हणणारा आहे, पण अशा प्रकारचं गंडांतर आणण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

बारामती : शिक्षणाच्याच मुळावर काही जण येऊ पाहत आहेत. अपुऱ्या पटसंख्येचे कारण समोर करून हजारो मराठी शाळा (School) बंद करण्याचा घाट सध्याच्या ईडी (ईडी म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार असा उल्लेख त्यांनी केला.) सरकारने घातला आहे, या मुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होईल, राज्यातील शिक्षणाची स्थिती गंभीर करता येणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.(ED government's plan to close thousands of Marathi schools in the state : Ajit Pawar)

बारामतीत आज (ता. १६ ऑक्टोबर) विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी ही टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘सकाळ’मध्ये प्रसिध्द झालेली यासंदर्भातील बातमीच या वेळी वाचून दाखवली. कमी पटसंख्येच्या १४ हजार ९८५ शाळा बंद करण्याची हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. नाशिकमधील शाळा नाही तर मग आम्हाला शेळ्या द्या ही देखील ‘सकाळ’मधील बातमी त्यांनीया वेळी वाचली.

Ajit Pawar
जामनेरच्या ‘त्या’ पोलिसाच्या माध्यमातून माझ्या अटकेसाठी षडयंत्र रचलं जातंय : खडसेंचा गौप्यस्फोट

जिथं शिक्षण पोहोचलं नाही, दुर्गम भाग आहे, तेथील शाळा बंद कशा करता येतील, असा सवाल करत अजित पवार म्हणाले की, मीही अनेक वर्ष अर्थमंत्री होतो. मी तसा शिस्तीचा कडक आहे, चुकलं तर माझ्या जवळच्यालाही चुकलंच म्हणणारा आहे, पण अशा प्रकारचं गंडांतर आणण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही. पुरोगामी महाराष्ट्रात शाळा बंद होऊ नयेत; म्हणून सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

Ajit Pawar
सोलापूरचे लळीत सरन्यायाधीश झाले अन्‌ आमचा ऊर आनंदाने भरून आला : शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

दीपक केसरकरांनी मध्यतंरी गृहपाठच बंद करायच सूतोवाच केल होत, अस चालणार नाही. सरकारला ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावच लागेल, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

Ajit Pawar
मोठी बातमी : भाजपचा बालेकिल्ल्यातच धुव्वा; फडणवीस-बावनकुळेंच्या जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे यश

राज्यातील सध्याचे वातावरण चिंता करावे, असे आहे. पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप व रब्बी ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. शेतक-यांना काहीच मदत होत नाही. जाहीर केलं जातं, पण मदत काही मिळत नाही. ही बाब लोकं बोलून दाखवितात, अशी टीकाही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.

Ajit Pawar
देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान : 'अजितदादा स्वतः अस्वस्थ आहेत'

राजकारण आम्ही राजकारणापुरत करतो. पण, काळाची पावले ओळखून वागल तर बारामतीची निर्मिती होत असते. हे काम एकट्याने होत नाही; तर असंख्य हातांची साथ मिळते म्हणून हे घडते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com