राज्यसभेतील भूकंप...विधान परिषदेतही करणार.. चंद्रकांत पाटील

आम्ही येथे थिंक इन ॲडव्हान्स, थिंक इन डिटेल Think in advane and think in detail ही पॉलिसी वापरली आहे, असे श्री. पाटील Chandrakant Patil यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेतील भूकंप...विधान परिषदेतही करणार.. चंद्रकांत पाटील
Chandrakant Patilsarkarnama

पुणे ः राज्यसभेचा उमेदवार कंजुस असल्याने त्याने विजयाचा गुलाल विधान परिषदेसाठी राखून ठेवला आहे, असे सांगून विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजप काठावरचे नव्हे तर पाचही जागा चांगल्या मताने जिंकणार आहे. जो भूकंप देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेत आम्ही केला, तोच भूकंप आम्ही विधान परिषदेत करणार आहोत. भाजपला मोठा विजय मिळणार आहे, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष BJP state president चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी व्यक्त केला आहे.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपला काही मते कमी पडत आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, काठावर मते आहेत हा विषय नाही सहजपणे निवडणूक काढण्याची आमची तयारी आहे. आम्ही येथे थिंक इन ॲडव्हान्स, थिंक इन डिटेल ही पॉलिसी वापरली आहे. राज्यसभेचा उमेदवार कंजुस मारवाडी असल्याने त्याने हा गुलाल विधान परिषदेसाठी शिल्लक ठेवला आहे.

Chandrakant Patil
धास्तीमुळेच पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिले नाही!

आम्हाला काठावरचे नव्हे, तर पाचही जागा चांगल्या मताने जिंकणार आहोत. जो भूकंप देवेंद्रजींनी राज्यसभेत आम्ही केला. तोच भूकंप आम्ही विधान परिषदेत करणार आहोत. भाजपला मोठा विजय मिळणार आहे. नातेवाईक कोणी कुठेही असले तरी पक्षाशी निष्ठा महत्वाची असते. गुप्त मतदानात काहीही लपून राहात नाही. ते कधीही तरी समजतेच. आमच्या पक्षात देश प्रथम, व्दितीय पक्ष, असे धोरण आहे. पक्षाशी गद्दारी आमच्या पक्षात चालत नाही. नातेवाईकांचा विषय सर्वात शेवटी आहे.

Chandrakant Patil
मलिकांसह जैन यांचं मंत्रिपदही जाणार? भाजप नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

आदित्य ठाकरे आयोध्या दौऱ्यावर विचारले असता परमेश्वर मानायचा नाही, असे म्हणाऱ्यांसोबत सध्या ते बसलेले असतानाही इथं परमेश्वर मनोभावे मानतात हे माझ्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, एप्रिल फुलप्रमाणे ही बातमी असून मुंबई अध्यक्ष बदलण्याचा विषयच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in