मागील सरकारच्या काळात विरोधकांनी सातत्याने त्रास दिला : हर्षवर्धन पाटलांचा रोख कोणाकडे?

कर्मयोगी कारखाना सुरू होण्यापूर्वी मागील हंगामातील उसाची एफआरपीची रक्कम देणार
 Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : कोणतीही संस्था चालविताना त्यास राजाश्रय महत्वाचा असतो. दुर्दैवाने यापूर्वी आपण सत्तेमध्ये नसल्याने अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागत होता. विरोधक आपल्याला सातत्याने त्रास देऊन टार्गेट करीत होते. आता केंद्र व राज्य सरकारमध्ये आपले डबल इंजिन सरकार आले आहे. सर्व प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही सभासदांनी माझ्यावर सोडावी. कारखाना सुरू होण्यापूर्वी मागील ‘एफआरपी’ची (FRP) रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन माजी सहकार मंत्री आणि कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी दिले. (During the previous government, the opposition constantly harassed : Harshvardhan Patil)

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा लीलावती सांस्कृतिक भवन येथे झाली. त्यावेळी या वर्षीच्या उसाची एफआरपीप्रमाणे रक्कम एकरकमी मिळावी, तसेच मागील राहिलेले साडेतीनशे रुपयांचा हप्ता तातडीने द्यावा, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या शेतकऱ्यांनी या सभेत केल्या. त्यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत सुरुवातीला आक्रमक वाटू लागलेली सभा शांततेत पार पडली. यावेळी कारखान्याच्या माजी अध्यक्षा पद्मा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

 Harshvardhan Patil
संतांच्या दर्शनासाठी सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चकवा!

रयत क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी सभेत विविध प्रश्नांवर आवाज उठवत शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी रक्कम मिळाली नाही, तसेच अंतिम हप्ताही राहिलेला आहे. अकरा लाख टन गाळप झाले असून शेतकऱ्यांचे पैसे मागे का ठेवता, असा सवाल उपस्थित केला. अभिमन्यू शिंदे यांनी कारखान्याचा पेट्रोल पंप हा सतत बंद असतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तो पंप सुरळीतपणे चालू ठेवावा, अशी मागणी केली. एका शेतकऱ्याने उसाला दर कितीही द्या. मात्र, दिवाळीला प्रत्येक सभासदाला दहा किलो साखर मोफत वाटावी, असा विषय मांडला. अनेक सभासदांच्या प्रश्नांवर माजी मंत्री पाटील यांनी उत्तरे दिली.

 Harshvardhan Patil
गुलाबराव पाटलांनाही आता ‘बिग बॉस’चे वेध; म्हणाले, ‘ही तर सोन्यासारखी संधी’!

मागील वर्षीच्या दराबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला अडीच हजार रुपये दर देण्याचा जो मी शब्द दिला होता, तो पाळणार आहे. इंदापूर तालुक्यातील आपल्या कार्यक्षेत्रातील साडेचार लाख टन चांगला शेलका ऊस बाहेरच्या कारखान्यांना गेला. आपल्याकडे मात्र खोडवा, निडवा, जळालेला व जाळेला ऊस गाळप करावा लागला, त्यामुळे साखर उतारा कमी बसला. कारखाना सुरू होण्यापूर्वी राहिलेले साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. कामगारांना देखील या वर्षी १२ टक्के पगार वाढ केली आहे. आगमी गळीत हंगामात १६ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी ५०० ट्रॅक्टर, ५०० बैलगाड्या, ५०० ट्रॅक्टर गाड्या व पाच हार्वेस्टर असे नियोजन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com