धो-धो पावसामुळे पुण्याचे दिवसाआड पाणी झाले बंद, पिंपरीत मात्र 'जैसे थे'

PCMC|Rajesh Patil : तक्रारी मांडूनही त्यांचे निवारण होत नसल्याने जनसंवाद सभांना प्रतिसाद झाला कमी.
PCMC Commissoner Rajesh Patil
PCMC Commissoner Rajesh PatilSarkarnama

पिंपरी : गेल्या आठवड्यापासून पिंपरी-चिचंवडच (Pimpri-Chinchwad) नाही, तर पुण्यासह राज्यभर जोरदार पाऊस सुरु आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा त्यामुळे वाढलेला आहे. परिणामी पुण्यातील दिवसाआड पाणीपुरवठा रद्द झाला. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये तो सुरुच राहिलेला आहे. एवढेच नाही, धो धो पाऊस सुरु असूनही ऐन पावसाळ्यातही पाणी कमी दाबासह अपुरे मिळण्याच्या तक्रारी कायम आहेत. आजच्या पालिका प्रशासनाच्या साप्ताहिक जनसंवाद सभेतूनही त्याला दुजोरा मिळाला.

PCMC Commissoner Rajesh Patil
चंद्रकांतदादांचा पवारांना टोला; म्हणाले, जे केलं नाही त्यावर आता राष्ट्रवादी आंदोलन करणार

दरम्यान, तक्रारी मांडूनही त्यांचे निवारण होत नसल्याने जनसंवाद सभांना मिळणारा प्रतिसाद आता रोडावू लागला आहे. दर सभेला पुन्हा पुन्हा मांडण्यात येत असलेल्या त्याच त्या तक्रारींतूनही त्याला दुजोरा मिळतो आहे. त्यात पावसाने उघडीपच दिली नसल्याने पिंपरी पालिका प्रशासनाच्या जनसंवाद उपक्रमाकडे जनतेने आज, तर पाठच फिरवली, अशी स्थिती होती.

१३ मार्चला पालिकेची मुदत संपल्यानंतर २१ मार्चपासून पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयात दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्यास सुरवात केली. शहरात गेल्या पावणेतीन वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने पहिल्याच या सभेत पाणीटंचाईबाबत तक्रारी आल्या. त्या आजच्या १५ व्या सभेपर्यंत साडेतीन महिन्यानंतरही कायम राहिल्या आहेत. कमी दाबाने व पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार सुटलेली नाही. या सभेत तक्रार देऊनही ती मार्गी लागत नसल्याचा अनुभव काळेवाडी येथील संजय गायके यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितला. त्याला सांगवीतील प्रदीप गायकवाड यांनीही दुजोरा दिला.

PCMC Commissoner Rajesh Patil
गंभीर गुन्ह्याचा तपास सोडून पिंपरी पोलिसांचे लक्ष दारु अन् गुटख्यावर

सुरवातीच्या जनसंवाद सभेत दीडशे व नंतर शंभरावर तक्रारी आल्या. नंतर हे प्रमाण कमी होत गेले. गेल्या वेळच्या या सभेला (४ जुलै) ते सत्तरवर आले. तर, आज ही संख्या आणखी घटून ५४ झाली. त्यात सर्वाधिक या 'ग' क्षेत्रीय कार्यालयातील सभेतील होत्या. आजच्या सभेत नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या व सूचना केल्या. त्यात पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा ही पहिल्या सभेपासूनही तक्रार कायम होती. रस्त्याच्या बाजूला कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, अनधिकृत पत्राशेड, अनधिकृत ड्रेनेज वाहिन्या, अनधिकृत बांधकामे, तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे, दुकानांसमोरील अतिक्रमणे आदी तक्रारीही या सभेत मांडण्यात आली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in