‘महाराष्ट्र बंद’च्या इशाऱ्यामुळे महाविद्यालये सुरू होण्याचा मुहुर्त आता मंगळवारी

सोमवारी सुरू होणारी महाविद्यालये आता मंगळवारी सुरू होणार आहेत.
‘महाराष्ट्र बंद’च्या इशाऱ्यामुळे महाविद्यालये  सुरू होण्याचा मुहुर्त आता मंगळवारी
Pune UniversitySarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : येत्या सोमवारी (ता.११) राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याने शहर व जिल्ह्यातील महाविद्यालये उघडण्याचा मुहुर्त एक दिवसाने पुढे गेला. सोमवारी सुरू होणारी महाविद्यालये आता मंगळवारी सुरू होणार आहेत.

आधीच्या नियोजनाप्रमाणे सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्यात येतील, असे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते.मात्र, उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बंद पुकारल्याने या नियोजनात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Pune University
तराफा बंद पडल्याने अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध

बंदच्या घोषणेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सोमवारचा मुहुर्त टाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पुणे महापालिकेते या संदर्भातील सुधारीत आदेश शविवारी काढला.कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याचे महापालिकेते स्पष्ट केले असून महाविद्यालयांच्या प्रशासनाने याचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

Pune University
अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले; आपण कायद्याचे पालन करणारे; निदर्शने कशासाठी ?

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सुमारे दीड र्वापासून राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. शाळा महाविद्यालयांचे वर्ग या काळात ऑनलाइन पद्धतीने सुरू होत. मात्र, ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने शाळा महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली असली तरी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे बंधन सर्वांनाच घालण्यात आले आहे. मास्क आणि सामाजिक अंतर पालनाचे नियम मोडता कामा नये, असे शाळा-महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.