सत्तांतरामुळे भाजप आमदार लांडगे जोरात...

Mahesh Landge|BJP|PCMC : शहरातील प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा, त्याचा पाठपुरावा करू, असे आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांना सुचविले आहे.
MLA Mahesh Landge Latest News
MLA Mahesh Landge Latest NewsSarkarnama

पिंपरी : राज्यात नुकताच सत्ताबदल होऊन विरोधी बाकावरील भाजप (BJP) सत्तेत आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) हे आता अधिक सक्रिय झाले आहेत. मंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांनी आज (ता.१५ जुलै) पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्याबरोबर मॅरेथॉन बैठक घेतली. तीत लोकोपयोगी प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यास त्यांनी सांगितले. तसेच शहरातील प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा, त्याचा पाठपुरावा करू, असे सुचविले. (MLA Mahesh Landge Latest News)

MLA Mahesh Landge Latest News
पिंपरी-चिंचवडच्या `पुष्पा`ला पालिका प्रशासक पाटलांनी दाखवला हिसका

१३ मार्च रोजी भाजप सत्ताधारी पिंपरी पालिकेची मुदत संपली. १४ मार्चपासून प्रशासक म्हणून पाटील यांची राजवट सुरु झाली. त्यानंतर लांडगे यांनी आयुक्तांबरोबर सविस्तर असा आढावा प्रथमच घेतली. राज्यात नुकताच सत्ताबदल होऊन भाजप पुन्हा सत्तेत आल्याने लांडगे हे लगेचच अधिक सक्रिय झाल्याचे त्यातून दिसून आले. विविध विषयांवर चर्चा या बैठकीत झाली.

शहरात स्वतंत्र इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा व तिच्या प्रायोजकांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. प्रशासक काळात कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, याविषयीही यावेळी त्यांना माहिती देण्यात आली. पुढील काळात लोकोपयोगी कोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहेत, गृहनिर्माण संस्थांत मलनिस्सारण धोरण काय असावे? सोसायट्यांना पूर्णत्वाचा दाखला देताना महापालिकेची काय जबाबदारी असावी, सिटी सेंटर आणि महापालिकेच्या नवीन इमारतीसंदर्भात चर्चा झाली. भोसरी कुस्ती केंद्रात किती विद्यार्थी असावे? खर्च किती येईल? नियोजन कसे असावे? कोणत्या माध्यमातून चालवले पाहिजे? त्याचे उद्घाटन कधी करावे? यावरही विचारविनीमय झाला.'डियर सफारी पार्क' आणि मोशी येथील क्रिकेट स्टेडियम या दोन्ही प्रकल्पांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची सूचना आ.लांडगेंनी यावेळी केली.

MLA Mahesh Landge Latest News
प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त अधिकाऱ्यांना परत बोलवा : महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे लांडगेंनी स्वागत केले. त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व आता महाराष्ट्रात सुरू झाले असून 'सबका साथ, सबका विकास' हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र आता महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in