Pune DRDO Crime News : 'डीआरडीओ'चे शास्त्रज्ञ कुरुलकर 'असे' अडकले 'हनी ट्रॅप'मध्ये

Pune News : १५ मे पर्यंत एटीएस कोठडीत वाढ
Pradeep Kurulkar
Pradeep KurulkarSarkarnama

DRDO director Pradeep Kurulkar : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांना देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानला देण्याच्या आरोपावरून एटीएसने अटक केली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराने त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून माहिती काढून घेतली. संबंधित महिलेने कुरुलकर यांच्याशी प्रथम 'व्हॉटसॲप'च्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. (Pradeep Kurulkar Honey trap case)

Pradeep Kurulkar
Aditya Thackeray News : 'काळजी करू नको आदित्य..' ; 'या' अभिनेत्री आल्या ठाकरेंच्या साथीला !

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर पाकिस्तानी महिलेशी ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलत होता. एटीएसला भारतीय शास्त्रज्ञ कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्या 'व्हॉट्सअॅप चॅट्स' मिळाले आहेत. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानमधून काही मेल आले होते. त्या मेलला त्यांनी प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. तसेच पाकिस्तानी मेल आयडीवर मेल केल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले. मेलची माहिती गुगुलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. पण यामध्ये नेमके संभाषण काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही. (Haney Trap News)

Pradeep Kurulkar
Maharashtra Political Crisis : '...तर शिंदे सरकार अजूनही सत्तेत कसे?' ; न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेसचा तिखट सवाल!

फॅन असल्याचे सांगून साधली जवळीत

कुरुलकर याला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवणाऱ्या महिलेने झरा दास गुप्ता नावाने पहिले व्हॉट्सअॅप केले. त्यावेळी तिने मी भारतीय कुरुलकरची मोठी फॅन असल्याचा दावा केला होता. तिने केलेल्या कौतुकाने कुरुलकर भारावून गेले. ती सतत पाकिस्तानला शिव्या देत होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढत गेला. ते दोघे व्हॉट्स अपच्या माध्यमातून चॅट करत होते. दरम्यान, कुरुलकरांनी ती पाकिस्तानी असल्याचे माहीत नसल्याचे एटीएस टीमला सांगितले. (DRDO News)

Pradeep Kurulkar
Mahadev Jankar : शिंदे, ठाकरे, पवारांना मदत करा पण भाजप-काँग्रेसला नको; जानकर असं का म्हणाले ?

प्रोफाईलने प्रभावित

कुरुलकरांनी सांगितले की, "ती सोशल मीडियावरील माझे प्रोफाइल पाहून प्रभावित झाली होती. ती महिला पाकिस्तानी असल्याचे माहीत नव्हते. ती नेहमी पाकिस्तानला शिव्या देत होती. दरम्यान, अडकल्याचे समजल्यानंतर तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर तिने दुसऱ्या क्रमांकावरुन संपर्क साधला. फेब्रुवारी महिन्यापर्यंत तिच्या संपर्कात होतो." (Pune DRDO)

Pradeep Kurulkar
Uddhav Thackeray : ...म्हणूनच उद्धव ठाकरे आज सत्तेबाहेर; आशिष जयस्वालांनी सगळंच सांगितलं

लॅपटॉप, मोबाईल जप्त

कुरुलकरांनी देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही फोटो शेअर केले असल्याचेही समोर आले आहे. 2022 मध्ये कुरुलकरांनी सहा देशांना शासकीय पासपोर्ट वापरत भेट दिली होती. यावेळी ते कुणाला भेटले? याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, कुरुलकर यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जानेवारीत त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. याचा फॉरेंसिक रिपोर्ट मंगळवारी न्यायालयात सादर करण्यात आला. या डिव्हाईसमधील काही डेटा डिलीट केल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Pradeep Kurulkar
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची आता नव्या संघर्षाची तयारी; आमदारांसोबत 'मातोश्री'वर खलबतं

१५ मे पर्यंत कोठडी

दरम्यान, फॉरेंसिक रिपोर्टच्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येणार आहे. तसेच बँक स्टेटमेंटमधील नोंदींची चौकशी, तसेच शासकीय पासपोर्ट वापरून कोणत्या देशाला भेटी दिल्या, तेथे कोणाला भेटी दिल्या, या गुन्‍ह्यात कुरुलकरांना कोणी मदत केली, यासह अधिक बाबींचा तपास करण्यात येणार आहे. हे प्रकरण खळबळजनक असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गुन्ह्याचा सखोल तपास होणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. दरम्यान, प्रदीप कुरुलकरला न्यायालयाने १५ मे पर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com