डॉ. उल्हास बापट म्हणतात; सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घटनापीठ नेमायला हवे

सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेशिवाय शिवसेनेने आणखी पाच याचिका दाखल केल्या आहेत.
Ulhas Bapat
Ulhas BapatSarkarnama

णे : राज्यातील सोळा आमदारांच्या आपात्रतेच्या विषयात घटनेप्रमाणे नेमके काय अभिप्रेत आहे. याचा अर्थ लावण्याची जबाबदारी आता संपूर्णत: घटनापीठाची आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) विनाविलंब पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ नेमायले हवे, अशी अपेक्षा घटनेचे अभ्यासक डॉ.उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी व्यक्त केले.

Ulhas Bapat
शिवसेनेचे ११ खासदार अमित शहांना भेटले; ठाकरेंना कोंडीत पकडण्याची रणनीती तिथंच ठरली!

सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आजच्या आज या विषयावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या विषयांमध्ये खंडपीठ नेमून सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, अशा विषयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर घटनापीठ नेमून या संदर्भात घटनेचा अर्थ लावायला हवा, अशी भूमिका घटनेचे पुण्यातील अभ्यासक डॉ. बापट यांनी व्यक्त केले.

Ulhas Bapat
शरद पवार आणि रावसाहेब दानवे दिल्लीत एक कार्यक्रम ठरविणार....

राज्यात सत्तांतर झाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा आहे. दरम्यान सोळा आमदारांना दिलेली नोटीस आणि त्यांची अपात्रता या संदर्भात शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पुढील सुनावणी होईपर्यंत या सोळा आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेशिवाय शिवसेनेने आणखी पाच याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यासाठी खंडपीठ नेमण्यात येईल. सुनावणीची तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे न्यायालयांने आज सांगितले. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. बापट म्हणाले, ‘‘ या विषयातून घटनेचा नेमका अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ नेमायला हवे. देशातील मजबूत लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. अशी परिस्थिती जेव्हा-जेव्हा निर्माण होते. तेव्हा घटनापीठ नेमून योग्य निर्णय होण्याची आवश्‍यकता असते.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in