डॉ. राजेंद्र जगताप यांनी ‘पीएमपीएमएल’चा कार्यभार सोडला

डॉ.जगताप यांच्या नियुक्तीची मुदत आज संपत होती.
rajendra.jpg
rajendra.jpg

पुणे : पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज सोडला. जगताप यांच्या नियुक्तीची मुदत आज संपत होती. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ न दिल्याने पदभार सोडत ते संरक्षण दलातील मूळ नियुक्तीवर रूजू झाले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरनार यांच्याकडे ‘पीएमपीएमएल’चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.(Dr. Rajendra Jagtap leaves PMPML).  

गेल्यावर्षी जुलै महिन्यात डॉ. जगताप संरक्षण दलातून प्रतिनियुक्तीवर पीएमपीएलमध्ये रूजू झाले होते. गेल्या अकरा महिन्यांच्या काळात त्यांनी विविध योजना राबवून पीएमपीएमएल सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा काळ असल्याने अनेक आव्हाने होती. बराच काळ पीएमपी सेवा बंदच होती. मात्र, त्यानंतर प्रवाशांसाठी विविध योजना राबवत त्यांनी बससेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक अभिनव योजना सुरू केल्या.पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेर पीएमआरडीएच्या हद्दीत बससेवा सुरू केली. या सेवेतून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत आहे. ई-बस खरेदी करण्याचा त्यांचा निर्णय महत्वाचा ठरला. 

डॉ. जगताप यांनी यापूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. संरक्षण दलातील आयडीइएस या मूळ पदावर नियुक्ती असलेले डॉ. जगताप यांनी पुण्यात तसेच नगर कॅन्टोन्मेन्ट बोर्डात काम केले आहे. 
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com