नीलम गोऱ्हेंना पाहताच रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बापटांनी विचारला प्रश्न; म्हणाले...

Neelam Gorhe News : भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यावर मागील काही दिवसांपासून शहरातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Neelam Gorhe, Girish Bapat
Neelam Gorhe, Girish BapatSarkarnama

Neelam Gorhe News : भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यावर मागील काही दिवसांपासून शहरातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाचे डॉ. भट, शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

बापट साहेब कसे आहात, असे गोऱ्हे म्हणताच ठीक आहे. बापट साहेब सभागृहातील अनेक सदस्य आपली आठवण काढत आहेत. तुम्ही अधिवेशनात जे कामकाज केले. त्याबद्दल अनेकांनी आठवण काढली, असे गोऱ्हे यांनी यावेळी बापट यांना सांगितले. अधिवेशन होताच आपणास अनेक सदस्य भेटण्यास येणार आहेत.

Neelam Gorhe, Girish Bapat
मुख्यमंत्री शिंदेंनतर अब्दुल सत्तार अडचणीत; न्यायालयाचे कठोर ताशेरे : पुन्हा भूखंड घोटाळा?

आपण लवकर बरे व्हा, असे म्हणताच बापट म्हणाले हो ताई, पण अधिवेशन कस चाललय आणि आणखी किती दिवस सुरू आहे, असा प्रश्न केला. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या की, सभागृह चांगल चाललय आणि ३० तारखेपर्यंत अधिवेशन चालेल. मात्र, तुम्ही लवकर बरे व्हा, नागपूरला या अशा प्रकारे या दोन नेत्यामध्ये संवाद झाला.

त्यानंतर गोऱ्हे यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या रूबी हॅालमध्ये जाऊन प्रकृतीची चौकशी केली. यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, शक्यतो रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. सध्या नागपूर पुणे किंवा नागपूर मुंबई या दरम्यान दिली जाणारी विमान सेवा 8 किंवा 9 वाजता आहे. ही विमाने रोजच ऊशीरा येतात. पुण्याबाहेर जाणारे आमदार व प्रवासी यांना त्यांच्या वेळा गैरसोयीच्या असून त्यामुळे प्रवास करताना अनेक अडचणींना नेत्यांना सामोरे जावे लागते.

Neelam Gorhe, Girish Bapat
Eknath Shinde News : AU विरुद्ध ES राजकारण तापले : शिंदेंचे, राऊतांना प्रत्युत्तर; प्रकरण काय?

पण काही वर्षापूर्वी अधिवेशन झाल्यावर आमदारसाठी विशेष विमान सेवा दिली जात होती. मात्र, आता अशा प्रकारची सेवा दिली जात नाही. त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकारी वर्गाने अपघात प्रवण क्षेत्र आहे. त्या ठिकाणाची पाहणी करण्याची गरज असून विशेष उपाययोजना करण्याची गरज, असल्याचे त्यांनी सांगितले. मला आठवते की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे की, तुम्ही रात्रीचा प्रवास करू नका. त्यामुळे शक्यतो ऊशीरा रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे, असे आवाहन राज्यातील सर्व नेत्यांना त्यानी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com