डॉ. नीलम गोऱ्हे म्हणतात; पुण्याला हवे एकमुखी नेतृत्व !

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र आहेत.
Nilam Gorhe
Nilam Gorhesarkarnama

पुणे : पुण्याचे महानगर (Pune Metro city) म्हणून आकार घेत आहे. शहराभोवतालच्या चारही रस्त्यांवर रोजच वाहतूक कोंडी होत आहे. रिंग रोड, विमानतळ, मेट्रो असे मोठे उपक्रम प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक प्रलंबित प्रश्नांमुळे पुणेकर निराधार झाले आहेत, असे वाटत आहे.या शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी एकमुखी नेतृत्त्वाची गरज असल्याची भूमिका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr.Neelam Gorhe) यांनी व्यक्त केली.

Nilam Gorhe
फडणविसांच्या कार्यालयामुळे २० वर्षानंतर पेंशन जमा झाली अन् अनुसयाबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले

पुण्यात बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘ पुण्याच्या प्रश्नांबाबत विधी मंडळाच्या अधिवेशनात फारसे प्रश्न उपस्थित झाले नाहीत. शहराच्या रेंगाळलेल्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नियुक्त झाल्यावर पुण्यातच बैठक घेणार असून त्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात येईल.’’

Nilam Gorhe
शिवसेनेच्या नादाला लागल्यास राखरांगोळी; भास्कर जाधवांनी ठणकावले

शहराच्या वाहतूक सुधारणांना प्राधान्य मिळण्याची गरज आहे. त्यासाठीचे अनेक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यांची मांडणी प्रभावीपणे करून पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील खासदार, आमदार, नगरसेवकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

शहरात एकमुखी नेतृत्त्वाचा अभाव असल्यामुळे काही प्रश्नांची सोडवणूक होण्यास मर्यादा असल्याचेही मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महापालिका स्तरावरही निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विचारात घ्यायला पाहिजे. कोणीही उठतो आणि कोणतेही फलक लावतात, पुणेकरांची अडवणूक करतात. अधिकारी परस्पर निर्णय घेतात, हे कशाचे लक्षण आहे, असा प्रश्‍न डॉ. गोऱ्हे यांनी केला.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांच्या भावना समजून घेतील आणि या बाबत तातडीने उपाययोजना करतील, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in