विजय शिवतारेंचा राजकीय वारस ठरला; ममता लांडेंकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी!

शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून विजय शिवतारे यांची कन्या राजकारणात सक्रिय
Vijay shivtare-Mamta Lande
Vijay shivtare-Mamta LandeSarkarnama

सासवड शहर (जि. पुणे) : माजी राज्यमंत्री आणि पुरंदरचे शिवसेनेचे (shivsena) माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आपला राजकीय वारस म्हणून कन्या डॉ. ममता लांडे-शिवतारे यांना पुढे आणले आहे. त्यांच्याकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानिमित्ताने शिवतारे यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या डॉ. ममता लांडे याच चालविणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Dr. Mamta Lande is the political heir of Vijay Shivtare)

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. ममता लांडे-शिवतारे या पुरंदर-हवेलीत पक्षाचे काम पाहणार आहेत. या पदाच्या माध्यमातून शिवतारे यांच्या कन्या ममता या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. समन्वयक या नात्याने त्या आता पुरंदर-हवेलीतील पक्षाचे महिला संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आता शिवसेनेने त्यांच्याकडे दिली आहे. विजय शिवतारे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Vijay shivtare-Mamta Lande
किरीट सोमय्यांच्या भीतीने अनिल परबांनी मुरुडमधील जमीन विकली

डॉ. ममता शिवतारे या दबंग पोलिस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. शिवतारे यांच्या स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्या काम पाहतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. आरक्षणामुळे महिलांना पन्नास टक्के जागांवर निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे पक्षाने महिला संघटन मजबूत करण्याचे हेतूने ममता शिवतारे यांच्याकडे ही मोहीम सोपवली आहे.

Vijay shivtare-Mamta Lande
राऊतसाहेब हिशेब द्या; अन्यथा मी तुमचा हिशेब करेन : किरीट सोमय्यांचा निर्वाणीचा इशारा

दरम्यान, ममता शिवतारे यांच्यासोबत पुरंदरमधील ॲड. गीतांजली ढोणे यांनाही शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक करण्यात आले आहे. ढोणे या पुरंदर तालुक्यातील नामांकित वकील आहेत. गराडे या ग्रामपंचायतीच्या त्या सदस्यही आहेत. पुरंदरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका करणे, त्यांना न्याय मिळवून देणे अशा कामांत त्या नेहमी अग्रेसर राहिल्या आहेत. गीतांजली ढोणे यांचे पती विजय ढोणे हे माजी राज्यमंत्री शिवतारे यांचे निष्ठावंत मानले जातात. पुरंदर तालुका महिला संघटकपदी काळेवाडी-दिवे येथील वैशाली बाजीराव काळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com