
Yashpal Sarvade passes away news : मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते यशपाल सरवदे यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुले, जावई असा परिवार आहे.
धम्म प्रचार, प्रसार तसेच इतिहासाचे संशोधक म्हणून त्यांची ओळख होती. आज (रविवारी) दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर धाराशिव (उस्मानाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा, दलित, शोषितांच्या लढ्यात ते सक्रिय होते. विद्यापीठ नामांतराचा ठराव तत्कालीन विधानसभेत सर्वानुमते मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती.
तेव्हा नामांतर का होत नाही, असा सवाल तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना विचारला होता. मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांची गाडी सरवदे यांनी अडवली होती.
यशपाल सरवदे हे कणखर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची राज्यात ओळख होती. उस्मानाबाद नगरपालिकेचे तत्कालीन उपनगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 1997 मध्ये त्यांनी धाराशिव येथे धम्म परिषद घेतली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.