BJP News : राष्ट्रवादीतून आलेल्या आक्रमक महिला नेत्याला भाजपने दिले राज्याचे पद!

डॉ पाटील यांच्या नियुक्तीने भाजपच्या बारामती लोकसभा मिशनला मोठे बळ मिळाले आहे.
Dr. Archana Patil
Dr. Archana PatilSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलेल्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील महिला नेत्या डॉ अर्चना पाटील (Dr. Archana Patil) यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे. डॉ पाटील यांच्या नियुक्तीने भाजपच्या बारामती लोकसभा मिशनला मोठे बळ मिळाले आहे. डॉ अर्चना पाटील यांची ओबीसीमधील आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो. (Dr. Archana Patil appointed as Regional Vice President of BJP OBC Marcha)

डॉ. अर्चना पाटील या इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावच्या रहिवाशी आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी पाटील यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीत असताना पाटील यांच्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

Dr. Archana Patil
Devendra Fadnavis : नड्डांच्या सभेला फडणवीसांची अनुपस्थिती : बावनकुळे म्हणाले, ‘फडणवीसांचे टेंपरेचर १०३ वर...’

डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सप्टेंबर २०२२ मध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातील पाटील घराणे सुरुवातीपासूनच राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांनी माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Dr. Archana Patil
Aurangabad Teachers Constituency : आमदार विक्रम काळेंना राष्ट्रवादीतूनच आव्हान; वरिष्ठ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत?

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी मिशन बारामती अभियान सुरु केले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यासह बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मशिन बारामतीच्या अभियानामध्ये ओबीसीचे मतदान निर्णायक ठरु शकते. अर्चना पाटील यांची ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून मिशन बारामतीला बळ देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

यासंदर्भात डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पक्षसंघटन मजबुत करुन ओबीसी समाजाची ताकत पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com