मोफत उपचारासाठी लाच घेणारा डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवडसह मावळात लाचखोरीचे गुन्हे वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.
lcb.jpg
lcb.jpg

पिंपरी : राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार असूनही त्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना सोमाटणे फाटा (ता.मावळ, जि.पुणे) येथील पवना हॉस्पिटलमधील डॉक्टर व मार्केटिंग अधिकाऱ्याला काल (ता.२३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने अटक केली. या दोघांना२६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पुणे येथील विशेष न्यायालयाने आज (ता.२४) दिला.

पिंपरी-चिंचवडसह मावळात लाचखोरीचे गुन्हे वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. याच महिन्यात सहा तारखेला कामशेत (ता.मावळ) पोलिस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक (पीआय) सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) व हवालदार यांना पाच लाख रुपयांची लाच मागून त्यातील साडेतीन लाख रुपये घेताना पकडण्यात आले होते. फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्या भाच्याकडून या त्रिकूटाने ही लाच घेतली होती. त्याच भागात हा दुसरा ट्रॅप झाला. डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय ५६) आणि प्रमोद वसंत निकम (वय ४५) अशी यातील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गु्न्हा नोंद करण्यात आला आहे. यातील तक्रारदारांच्या वडिलांचे पवना हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलिसीसचे उपचार सुरु होते. तरीही त्यासाठी डॉ.वाढोकरने दहा हजार रुपये लाच मागितली. नंतर नऊ हजारावर तडजोड होऊन ती निकम याच्यामार्फत काल घेतली. पोलिस निरीक्षक अलका सरग या गुन्ह्याच्या तपासाधिकारी आहेत. त्यांनीच साडेतीन लाखाची लाच घेणारे कामशेत पोलिस ठाण्याचे पीआय, एपीआय आणि हवालदाराला पकडले होते.
----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com