Pune Municipal Corporation: मिळकतकराची 40 टक्क्यांची सवलत हवी असेल तर 'हे' करावं लागेल!

Pune News : तुम्हालाही मिळकतकराची 40 टक्के सवलत हवी आहे का? मग ही बातमी वाचाच..!
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama

Pune Municipal Corporation: पुणेकरांना महापालिकेकडून मिळकत करात देण्यात येणारी 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्यात आली. काही दिवसांपर्वी राज्य सरकारने याबाबतची घोषणा केली.

मात्र, पुणेकरांना मिळकतकराची ही सवलत कशी मिळणार? या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काय केले पाहिजे? ज्यांची सवलत काढून घेतली नव्हती अशा नागरिकांनी काय करावे? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

या सर्व प्रश्नाविषयी मिळकतकर विभागाने स्पष्टीकरण देत नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एप्रिल 2019 पासून ज्यांची सवलत आजही कायम आहे. त्यांनी पुन्हा 'पीटी 3' अर्ज भरण्याची गरज नाही.

जीआयएस सर्वेक्षणानंतर व एक एप्रिल 2019 नंतर ज्यांच्या मिळकतींची नोंद झालेली आहे, अशा नागरिकांना 40 टक्के सवलत नाही. त्यांनी ती पुन्हा मिळावी, यासाठी रहिवासी पुरव्यांसह 'पीटी 3' अर्ज भरावा, असे मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी स्पष्ट केले.

Pune Municipal Corporation
Pune BJP: बावनकुळेंनी सांगितली महापालिका निवडणुकांची तारीख अन् कार्यकर्त्यांना दिले कामाला लागण्याचे आदेश

नेमकं काय करावं लागेल?

- 40 टक्के सवलत ही फक्त स्वतः वापरासाठी असलेल्या निवासी मिळकतींना आहे. ज्यांनी भाडेकरू ठेवला आहे, त्यांना ही सवलत मिळणार नाही.

- जी.आय.एस.सर्वेक्षणात शोधलेल्या निवासी मिळकतधारकांची 40 टक्के सवलत 1 एप्रिल 2018 काढली आहे. तर 1 एप्रिल 2019 पासून पुढे नव्याने नोंदणी झालेल्या निवासी मिळकतींना 40 टक्के सवलत दिलेली नाही.

- जीआयएस सर्वेक्षणातील मिळकतींना 40 टक्केच्या फरकाची देयके पाठवण्यात आली होती.

- नव्याने नोंदणी झालेल्या मिळकतधारकांना 40 टक्के सवलत न देता पूर्ण बिल वसूल केले आहे.

- ज्या निवासी मिळकतींना 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 पर्यंत सवलत दिलेली नाही, अशा मिळकतधारकांना ही सवलत सुरू करण्यासाठी'पीटी 3’ हा अर्ज भरणे बंधनकारक आहे.

- हा अर्ज संपूर्ण पुराव्यांसह 15 नोव्हेंबर2023 पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

- संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम ‘पीटी 3’ अर्ज भरून दिल्यानंतर पुढील 4 वर्षांच्या समान हप्त्यातून वळती केली जाईल.

- जर या नागरिकांनी अर्ज भरला नाही तर ते त्या मिळकतीची वापर स्वतःसाठी करत नसल्याचे गृहित धरून 40 टक्क्यांची सवलत दिली जाणार नाही.

- मिळकतधारकांच्या सोयीच्या दृष्टीने ‘पीटी 3’ अर्ज नजीकच्या महापालिकेचे संपर्क कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय, मुख्यकार्यालय नागरी सुविधा केंद्र, पेठ निरीक्षक यांचेकडे जमा करता येणार आहे.

- 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या ज्या निवासी मिळकतींना दिलेली 40 टक्के सवलत आजही कायम आहे. त्यांनी‘पीटी 3’ अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

- ‘पीटी 3’ हा अर्ज संपर्क कार्यालय क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षक यांचे कार्यालयात उपलब्ध होणार आहेत.

Pune Municipal Corporation
BJP News : 20 मे पूर्वीच होणार भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड; काय असेल वयोमर्यादा? बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले

अर्ज सादर करताना कोणते पुरावे लागणार?

- सवलत प्राप्त करण्यासाठी ‘पीटी 3’ अर्जासोबत मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करत असल्याचे सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र (सोसायटी असल्यास)

- अर्जासोबत मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, रेशनकार्ड आदी.

- पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत ‘पीटी 3’ अर्जासोबत जोडावी.

- अर्ज सादर करताना त्यासोबत 25 रुपये चलन शुल्क संपर्क कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षकांकडे जमा करावे.

- अर्ज जमा केल्यानंतर पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षक यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी करून करआकारणी व करसंकलन प्रमुख यांच्याकडून प्रकरण अंतिम केला जाईल.

- पीटी ३ अर्ज इथे मिळेल. propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर देखील फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com