राहुल माझा विरोधक; तरीही ‘भीमा-पाटस’ला मदतीची सूचना जिल्हा व राज्य बँकेला केली

तर राजकारण करायचे काहीच कारण नाही.
Ajit Pawar_Rahul Kul
Ajit Pawar_Rahul KulSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील कर्मवीर सहकारी कारखाना बिनविरोध का केला, असे काहीजण विचारतात. पण, बिनविरोध करायचा की नाही हा आमचा अधिकार आहे. उगीच जिथं तिथं नाक खुपसलच पाहिजे का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच, दौंड तालुक्यातील भीमा-पाटस कारखाना आर्थिक संकटातून बाहेर निघत असेल तर राजकारण करायचे काहीच कारण नाही. उलट राहुल माझा विरोधक असला तरी जिल्हा व राज्य बँकेला मदतच करायला सांगितले आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. (District and State Bank gave instructed to help Bhima Patas factory : Ajit Pawar)

बारामती येथे सोमेश्‍वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची सभा नुकतीच पार पार पडली. या प्रसंगी आमदार संजय जगताप, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे उपस्थित होते.

Ajit Pawar_Rahul Kul
नितीनजी, तुम्ही रस्ता फार चांगला बांधला, तुम्हाला धन्यवाद : बिग बींनी केले होते गडकरींचे कौतुक

या प्रसंगी पवार म्हणाले, कर्मयोगी साखर कारखान्याने उसाला कमी भाव दिला आहे, तरीही तिथे सभासदांनी निवडणूक बिनविरोध केली. या उलट सोमेश्वर कारखान्याने 3100 रुपये प्रतिटन भाव दिला. तरीपण हौशे नवसे गवसे एकत्र येऊन विरोधात पॅनल टाकत आहेत. खरं तर सोमेश्वर कारखान्याने माळेगाव कारखान्यापेक्षा साडेतीनशे रुपये जास्त आणि छत्रपती कारखान्यापेक्षा सातशे रुपये जास्त भाव दिला आहे. माझा ऊस छत्रपतीला जातो, कधी कधी मला सातशे रुपये टनाला कमी मिळाले म्हणून झोप येत नाही, अशी मिश्किली टिप्पणी पवार यांनी केली.

Ajit Pawar_Rahul Kul
मंगलदास बांदलांच्या सहकाऱ्याला कोरेगावात सापळा रचून पकडले

राहुल कुल माझा विरोधक असला तरीही नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत मुंबईवरून ‘व्हीसी’ द्वारे बोलताना आयत्या वेळच्या विषयात भीमा पाटस कारखान्याचा विषय मीच काढला. ‘वन टाइम सेटलमेंट’साठी भीमा पाटस कारखान्याला मदत करा, असे मी सांगितले आहे. राज्य सहकारी बँकेलादेखील मदत करण्यास सांगितले आहे. अशा बाबतीत आम्ही कधीच राजकारण आणत नाही. ही बँक सामान्य लोकांची बँक आहे. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून महिला बचत गट, शेतकरी, साखर कारखाने यांना कसा परतावा देता येईल, याचा प्रयत्न करत असतो.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सव्वाचारशे लोकांपैकी एकवीस लोक निवडायचे होते. काहींना थांबवावे लागले. काही युवा चेहरे, काही अनुभवी द्यावे लागतात. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. पुढे अनेक निवडणुकात संधी मिळू शकते. कुणी रुसल्यास मी फोन करणार नाही. सगळ्यांचे अर्ज माघारी घेण्याची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख लोकांना दिली आहे, असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com