महापालिका निवडणुकीसाठी माजी नगरसेवक आणि इच्छूकांकडून मोफत तिरंगा वाटप

Pimpri-chinchwad Politics | सुरत येथून आलेले हे तिरंगे तीन ठेकेदारांमार्फत पालिकेला देण्यात येत आहेत.
Pimpri-chinchwad Politics
Pimpri-chinchwad Politics

पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी देशभर `हर घर तिरंगा` ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख,तर देशात तीस कोटी घरावर तिरंगा फडकावला जाणार आहे.हे बहूतांश ध्वज गुजरातमध्ये तयार करून देशभर वितरित केले जात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले व येणारेही तीन लाख राष्ट्रध्वज हे सुद्धा गुजरातमधूनच (सुरत) आले आहेत. (Pimpri-chinchwad Politics)

दरम्यान, मागणीपेक्षा पुरवठ्यात प्रथमच अभूतपूर्व वाढ झाल्याने तिरंगा निर्मितीचा दर्जा यावेळी योग्य राखता आलेला नाही. त्यातून कापडाचे कटिंग व्यवस्थित न झालेल्या तिरंगा ध्वजांचा पिंपरी-चिंचवडला पुरवठा झाला आहे. ते फडकावले, तर अवमान होण्याची भीती आहे.त्यामुळे फडकावण्यास अयोग्य असलेले हे ध्वज बाजूला काढण्याची कसरत पिंपरी पालिका प्रशासनाला करावी लागते आहे.

सुरत येथून आलेले हे तिरंगे तीन ठेकेदारांमार्फत पालिकेला देण्यात येत आहेत. राज्य सरकारकडूनही एक लाख राष्ट्रध्वज पालिकेला मिळाले आहेत. त्यातील ८० टक्के सदोष असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.ठेकेदाराने पुरविलेले व गुजरातमधून आलेलेही असंख्य राष्ट्रध्वज सरकारकडून पुरवठा झाले,तसेच आहेत त्यामुळे त्यांची तपासणी करून त्यातील योग्य असेच वितरित केले जात आहेत. कालपर्यंत दीड लाख तिरंगा वितरित करण्यात आले असून ते तीन लाख वाटप करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.

Pimpri-chinchwad Politics
Satara Politics| खातेवाटप कधी होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान,सरकारकडून मिळालेला तिरंगा पिंपरी पालिका प्रत्येकी वीस रुपये पन्नास पैशांना देत आहे.तर, आपल्या ठेकेदाराकडील तिरंग्यासाठी ते २४ रुपये घेत आहेत. मात्र, पालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक ध्यानात घेऊन शहरातील माजी नगरसेवकांनी हे ध्वज आपल्या प्रभागात मोफत वाटण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी ते पालिकेकडून विकत घेऊन नंतर त्याचे निःशुल्क वाटप करीत आहेत. त्यात भाजपचे माजी नगरसेवक आघाडीवर आहेत. त्यांच्याजोडीने पालिका निवडणुकीचे काही इच्छूकही हे असे वाटप करीत आहेत.

भाजपचे माजी महापौर राहूल जाधव, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती तथा अध्यक्षा ममता गायकवाड, माजी नगरसेविका सुनीता तापकीर आदींचा त्यात समावेश आहे. त्यांच्यासह `भाजयुमो`चे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे,चिंचवड़ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राज तापकीर आदी पदाधिकारीही मोफत तिरंगा देत आहेत. ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ हजार तिरंगे पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरित केले जाणार आहेत, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com