शिवसेनेत पदाधिकारी निवडीवरून भूकंप; ५८ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

शिवसेनेचे विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख सत्यवान उभे आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर हल्लाबोल
shivsena
shivsenasarkarnama

विजय जाधव/किरण भदे

भोर/नसरापूर (जि. पुणे) : नवीन पदाधिकारी निवडीवरून भोर (Bhor) तालुक्यातील शिवसेनेत (shivsena) भूकंप घडला असून सुमारे ५८ पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. शिवसेनेचे विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख सत्यवान उभे आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर हल्लाबोल करत भोर तालुक्यातील पश्चिम विभागाचे तालुकाप्रमुख युवराज जेधे, युवासेना अधिकारी केदार देशपांडे, भोर शहरप्रमुख नितीन सोनावले व युवासेना शहराधिकारी किरण पवार आदींनी पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. (Dissatisfied with the election of office bearers in bhor Shiv Sena; 58 people warned to leave the party)

दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या या नाराजीची जिल्हाप्रमुख चांदेरे यांनी तातडीने दखल घेत भोर तालुका गाठला असून संबंधितांशी चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर करण्यात येतील, असे सांगितले आहे.

shivsena
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या सत्काराला विनयभंगातील आरोपी व्यासपीठावर!

भोरमधील पत्रकार पत्रकार परिषदेत युवराज जेधे, केदार देशपांडे आणि नितीन सोनावले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याबाबत जेधे म्हणाले की, शिवसेनेचे विभागीय समन्वयक मिर्लेकर, संपर्कप्रमुख उभे आणि जिल्हाप्रमुख चांदेरे यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज आहोत. त्या नाराजीतूनच आम्ही शिवसेनेतील पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षवाढीसाठी आम्ही सूचविलेल्या उपायांची वरिष्ठांकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच आमच्या पातळीवर जे प्रश्न सुटत नाहीत, त्याबाबत वरिष्ठांकडून हालचाली होत नाहीत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिलेला आहे.

shivsena
प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोध नाहीच! मुंबै बँकेवर बिनविरोध

नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करताना चांगल्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलेले आहे आणि अकार्यक्षम कार्यकर्त्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून तालुक्यातील एकूण ५८ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेगळा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भोर शहरातील २६ आणि ग्रामीण भागातील ३२ जणांचा समावेश आहे, असेही जेधे यांनी सांगितले. आम्हाला वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून प्रवेशाचे निमंत्रण आलेले आहे. मात्र, आम्ही शिवसेना पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार आहोत, असेही युवराज जेधे, केदार देशपांडे व नितीन सोनावले यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

shivsena
राष्ट्रवादीच्या सोळंके - पंडितांचे पॅचअप : आता वाटचाल कोणत्या दिशेने?

दरम्यान, या नाराजीनाट्याची जिल्हाप्रमुख चांदेरे यांनी तातडीने दखल घेतली आहे. भोरमधील नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्यांचे गैरसमज दूर करण्यात येतील, असे त्यांनी नसरापूर येथे सांगितले. यावेळी चांदेरे यांच्या समवेत नवनियुक्त पश्चिम विभागाचे तालुका प्रमुख हनुमंत कंक, शिवसेनेचे सहकार विभागाचे प्रदीप खोपडे, वेल्हे तालुका प्रमुख दीपक दामगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते. चांदेरे म्हणाले की, नाराज कार्यकर्त्यांनी राजीनामा देताना वरिष्ठांवर आरोप केले आहेत. त्या बाबत मुंबईत वरिष्ठांसमवेत बैठक घेऊन त्यांचा गैरसमज दूर केला जाईल. पक्षाचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.

shivsena
बरमुड्यावर आलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांने दिली वाळू माफियांना हुलकावणी...

हुनमंत कंक यांनी सांगितले की, भोर तालुका पश्चिम विभाग तालुका प्रमुखांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते, त्यावर वरिष्ठांनी माझी नियुक्ती केली आहे. मी गेली अनेक वर्ष पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. यापुढेही पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. ज्या ५८ कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. पण, वस्तुस्थिती तशी नसून त्यातील फक्त 5 ते 6 जण नाराज आहेत, त्यांच्याशी पक्षातील वरिष्ठ चर्चा करणार आहेत. तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की, शासकीय कमिट्यावरील नेमणुका ह्या सर्वांना विश्वासात घेऊनच केल्या आहेत. संबंधितांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com