दूध संस्थेच्या संचालकांवर कोयत्याने वार : अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये वाद

रेणुकादेवी दूध संस्था ही दौंड तालुक्यातील सर्वात मोठी दूध संस्था आहे.
Daund NCP
Daund NCPSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : दौंड (daund) तालुक्यातील पारगाव येथील रेणूकादेवी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाडोत्री गुंडांच्या मार्फत संचालकांवर कोयत्याने करण्यात आले आहेत. या दोघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर गुंड फरार झाले आहेत. हे गुंड पारगाव येथील पण पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या एका उद्योजकाने आणल्याचा आरोप संस्थापक पोपटराव ताकवणे यांनी केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संस्थेचे संस्थापक पोपटराव ताकवणे निवडून आले आहेत. रेणुकादेवी दूध संस्था ही दौंड तालुक्यातील सर्वात मोठी दूध संस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षातील दोन गटांत हा वाद झाला आहे. (Dispute in NCP in election for the post of President of Dudh Sanstha in Daund)

रेणुकादेवी दूध डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. दूध संस्थेत संबंधित उद्योजकांना संचालक म्हणून घेण्यात आले आहे. या संचालकांना कात्रज डेअरीच्या निवडणुकीत प्रतिनिधी म्हणून जायचे होते, त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यातच डेअरीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष पोपटराव ताकवणे हे त्यांच्या मर्जीतील संचालक सहलीला घेऊन गेले होते.

Daund NCP
चांदेरेंना उपाध्यक्ष करत अजितदादांनी मुळशीला दिले सरप्राईज!

सहलीवर गेलेल्या संचालकांची गाडी आज दुपारी मतदानाच्या वेळी संस्थेच्या प्रवेशव्दाराजवळ आली असताना फॅारच्यूनर गाडीतून उतरलेल्या गुंडांनी संचालकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गुंगारा देत संचालक संस्थेत पोचले. या झटापटीत भाडोत्री गुंडांनी दोघांवर वार करण्याचा प्रयत्न केला. संस्थापक पोपटराव ताकवणे यांचा मुलगा रामकृष्ण ताकवणे यांच्यावर कोयत्याने वार होत असताना भीमा पाटस साखर कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी गुंडास अडविण्याचा प्रयत्न केला, त्यात ते जखमी झाले आहेत. सचिन ताकवणे हेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

Daund NCP
एमपीएससीच्या विद्यार्थ्याची पुण्यात पुन्हा आत्महत्या

दरम्यान या गोंधळाच्या वातावरणात निवडणूक पार पडली. या घटनेनंतर ग्रामस्थ जमा होऊ लागले. या गोंधळातच गुंडांनी तेथून पलायन केले. या घटनेमुळे गावात दुपारी तणावाचे वातावरण होते. त्यामुळे घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात पोपटराव ताकवणे बिनविरोध निवडणूक आले. अध्यक्ष निवडीनंतर संस्थेच्या कार्यालयामध्ये निषेध सभा घेण्यात आली. या वेळी संस्थापक ताकवणे, सयाजी ताकवणे, अरुण बोत्रे, सर्जेराव जेधे, मच्छिंद्र ताकवणे, सोमनाथ ताकवणे यांनी या घटनेचा निषेध केला. या वेळी सुभाष बोत्रे, संभाजी ताकवणे, दत्तात्रय ताकवणे, मधुकर ताकवणे, रवी ताकवणे, किसन जगदाळे, स्वामी शेळके आदी उपस्थित होते. दरम्यान सायंकाळपर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही.

Daund NCP
ईश्वर सातत्याने भाजपच्या बाजूने

यासंदर्भात पोपटराव ताकवणे म्हणाले की, हा सर्व प्रकार उद्योजक विकास ताकवणे यांनी केला आहे. प्रतिनिधी म्हणून जिल्हा दूध संघावर जाण्याची प्रक्रिया चार महिन्यांपूर्वी पार पडलेली आहे. भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन गावात दहशत निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसांत तक्रार देत आहोत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी.

उद्योजक विकास ताकवणे म्हणाले की, मी दूध संस्थेच्या कार्यालयात होतो. प्रवेशद्वारावर बाहेर काय झाले, हे मला माहीत नाही. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. पोपट ताकवणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा अर्ज नव्हता. आज मी फक्त त्यांना एकच सांगत होतो की, मला अध्यक्षपद नको; परंतु मला कात्रज दूध संघाच्या निवडणुकीसाठी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड करा. मात्र, त्यास पोपट ताकवणे तयार नव्हते. संस्थेच्या प्रगतीत आमच्या कुटुंबीयांचा वाटा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in