राज ठाकरेंची पाठ फिरताच मनसेत राडा; पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर

पक्षाच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी रात्री उशिरा राडा झाल्याचे समजते.
Dispute between MNS leader Ranjit Shirole and Shailesh Vitkar
Dispute between MNS leader Ranjit Shirole and Shailesh VitkarSarkarnama

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्दा दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते ठाकरेंच्या पाच जून रोजीच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. त्यासाठी राज्यभर नोंदणी सुरू करण्यात आली. पुण्यातही नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पण यासाठी आयोजित बैठकीतच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. (MNS Latest Marathi News)

पक्षाच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी रात्री उशिरा राडा झाल्याचे समजते. राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. पुण्यात त्यांची सभेतही नियोजन आहे. पण त्यांनी बुधवारी दौरा अर्धवट सोडून मुंबई गाठली. त्यासाठी तब्बेतीची कारण देण्यात आलं आहे. पण राज ठाकरेंची पाठ फिरताच पक्षातील खदखद बाहेर आली. (Dispute between MNS leader Ranjit Shirole and Shailesh Vitkar)

Dispute between MNS leader Ranjit Shirole and Shailesh Vitkar
महागाईचा कहर! मोदी सरकारनं घरगुती गॅसचे दर वाढवत पुन्हा दिला दणका

बुधवारी सायंकाळी पक्षाची अयोध्या दौऱ्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर आणि शिरोळे यांच्यातील वाद शिगेला पोहचल्याने गोंधळ झाल्याचे समजते.

शिरोळे हे पक्षाच्या कोणत्याही बैठकांना बोलावत नसल्याचा आरोप विटकर यांनी केला. यावरून शिरोळे हे विटकरांवर संतापले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात झटापट झाल्याची चर्चा आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्येही राड्याला सुरुवात झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांसमोरच वाद झाल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला.

Dispute between MNS leader Ranjit Shirole and Shailesh Vitkar
...त्याची किंमत मलाही मोजावी लागली! पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणींत

दरम्यान, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर ते नाव न घेता उघडपणे टीका करत आहेत. त्यांना पक्षाच्या बैठकांमधून डावलले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सध्या ते पक्षापासून दुरावल्याची चर्चा आहे. त्यातच मध्यवर्ती कार्यालयात दोन गट भिडल्याने पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in