Chinchwad By- Election : पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी पण बंडखोरीची हॅट्रिक करणाऱ्या कलाटेंवर कारवाई नाही...

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहूल कलाटे चर्चेत आहे.
Chinchwad By- Election | Rahul Kalate
Chinchwad By- Election | Rahul KalateSarkarnama

Chinchwad By- Election : चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहूल कलाटे चर्चेत आहे.त्यात त्यांना साथ देणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी काल करण्यात आली. पण, कलाटेंवर ती करण्याचे धाडस न दाखविण्यात आल्याने ही कारवाई चर्चेची ठरली आहे.

तसेच हे उशिराचे शहाणपण सुचल्याची चर्चा ऐकायला मिळाली. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी ती केली आहे.त्यांनी चिंचवड निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षाचे चिंचवड विधानसभा महिला संघटिका अनिता तुतारे,शहर संघटिका रजनी वाघ,विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस,विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ,पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवी घटकर यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे.

Chinchwad By- Election | Rahul Kalate
Maharashtra Politics : निवडणूक आयोग बरखास्त करा या ठाकरेंच्या मागणीला भाजप खासदाराचा पाठिंबा

दरम्यान, हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांत चिंचवड मतदारसंघाबाहेरील पिंपरीसह शहराच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने कलाटेंच्या बंडाला चिंचवडच नाही,तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातूनच साथ मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या कारवाईला कारणीभूत ठरलेल्या कलाटेंवर ती न झाल्याबद्दल शिवसेनेतूनच आश्चर्य व्य़क्त करण्यात येत आहे.

त्य़ासाठी कलाटे हे पक्षात कुठल्याच पदावर नसल्याचे शिवसेना नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिलेले कारण मूळ शिवसैनिकांना पटलेले नाही. तसेच त्यांना या बंडखोरीत साथ देणारे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षाच्या चार माजी नगरसेवकांवरही कारवाई न झाल्याने ती झालेल्या एका पदाधिकाऱ्याने संताप व्यक्त केला.

कलाटेंचे हे दुसरे बंड असून आतापर्यंत त्यांनी पक्षादेश न पाळल्याची हॅटट्रिक सुद्धा केलेली आहे.२०१९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून ते लढले.त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तरीही त्यांच्याविरुद्ध त्यावेळी काहीच कारवाई झाली नव्हती. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर सदस्य म्हणून अश्विनी चिंचवडे या नगरसेविकेची नियुक्ती करण्याचा पक्षादेश डावलून त्यांनी तेथे स्वत:ची वर्णी लावून घेतली. त्यानंतरही पक्षाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग केल्याचा बडगा उगारला नव्हता. आता,तर पक्षच नाही,तर आघाडीविरुद्ध बंड करीत ते पोटनिवडणुकीत अपक्ष उतरूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने त्याची जोरदार चर्चा आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com