राष्ट्रवादीला धक्का; आमदार बेनकेंच्या निष्ठावंताचा शिवसेनेत प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी जुन्नरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची मागील निवडणूक लढवली होती.
NCP's Baba Pardeshi join Shiv Sena
NCP's Baba Pardeshi join Shiv SenaSarkarnama

जुन्नर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात आमदार अतुल बेनके (Atul Benke) दखल घेत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून नाराज असलेले जुन्नर (Junnar) शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा करणी सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ बाबा परदेशी यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत मुंबईत ‘मातोश्री’वर हाती शिवबंधन बांधले. (Disgruntled Baba Pardeshi from NCP joins Shiv Sena)

आगामी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर परदेशी यांच्या पक्ष प्रवेशामुळे जुन्नर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे आहेत. परदेशी यांचा पक्षप्रवेश शहर शिवसेनेला अधिक बळकटी देणारा ठरणार आहे.

NCP's Baba Pardeshi join Shiv Sena
मल्लिकार्जून खर्गे यांचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी म्हणून संतोष परदेशी हे ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी जुन्नरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची मागील निवडणूक लढवली होती. गेल्या काही वर्षांत आमदार अतुल बेनके यांच्याकडून परदेशी यांची फारशी दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे त्यांच्यात नाराजीची भावना निर्माण झाली होती. शिवसेना प्रवेशापूर्वी त्यांनी आमदार बेनके यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात योग्य दखल घेतली जात नसल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

NCP's Baba Pardeshi join Shiv Sena
‘अजितदादांच्या मनात काय, हे साहेबांनासुद्धा कळंलं नाही, त्यामुळे ते कधी झटका देतील सांगता येत नाही!’

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिंदे गटाला जुन्नर शहरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, परदेशी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जुन्नर शहरात फटका बसू शकतो.

NCP's Baba Pardeshi join Shiv Sena
ZP Presidents Reservation : राज्यातील ३० ZP अध्यक्षांचे आरक्षण जाहीर; सोलापूर ओबीसी, तर पुणे खुले

जुन्नर नगर पालिकेची मुदत ९ जानेवारी २०२१ रोजी संपली आहे. मावळत्या नगर पालिकेत शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व पाच सदस्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि काँग्रेस पक्षाचा एक, आपला माणूस आपली आघाडीचे तीन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँगेसकडे उपनगराध्यक्ष पद होते. मात्र, उपनगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर झालेल्या निवडणुकीत बहुमत असूनही राष्ट्रवादी काँगेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला नगर पालिका निवडणुकीत काळजी घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com