Director Mahanand : 'महानंद'च्या संचालकपदी कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष केशरताई पवार

Director Mahanand : महानंद संचालकपदी केशरताई सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड.
 Keshartai Pawar
Keshartai Pawar Sarkarnama

Director Mahanand: महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघातच्या (महानंद) संचालकपदी पुणे जिल्हा दूध संघाच्या (कात्रज दूध संघ ) पहिल्या महिला अध्यक्ष केशरताई सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

केशरताई तब्बल १७ वर्षे पुणे जिल्हा सहकारी दुध संघावर संचालकपदी असून कात्रज संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून विराजमान आहेत. पारदर्शक कारभार व पक्ष निष्ठा या दोन गुणांवर त्यांना कात्रज ( Katraj ) संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार (Sharad Pawar) , विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), यांच्यासह पक्षाच्या सर्वच जेष्ठ नेत्यांनी टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे.

 Keshartai Pawar
Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी

“गेली १७ वर्षे कात्रज संघात मी जी सचोटी जपली ती जेष्ठ नेते शरद पवार, अजितदादा, सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांनी पारखली आणि माझ्यावर नवीन जबाबदारी टाकलीय ती पूर्ण क्षमतेने मी पार पाडेल. महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय वृद्धिंगतं होण्यासाठी तसेच दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी महानंदमध्ये माझा अनुभव पणाला लावून मी काम करीन”, असे त्या बोलतांना म्हणाल्या.  

 Keshartai Pawar
Eknath Shinde : मुख्यमंत्र्याची RSS मुख्यालयाला भेट, दीक्षाभूमीत डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिंना अभिवादन

जिल्ह्यातून अनेकजण इच्छुक असतांना, पवार यांची निवड झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काही नवीन संचालकांनी वरिष्ठांकडे पवार यांच्या विरोधात तक्रारी करुन काही गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले जात होते. मात्र, आत्तापर्यंत कुठलाही भ्रष्ट्राचाराचा आरोप सिद्ध झालेला नाही. पवार यांनी कात्रज संघाच्या पाच कामगारांचे निलंबन करुन. त्यांनी आपल्या कामाची आक्रमक शैलीची चुणूक दाखविली होती. याच पार्श्वभूमिवर त्यांना पक्षाकडून आता महानंद डेअरीच्या संचालकपदाची संधी देण्यात आली असून ही निवड बिनविरोध होईल यासाठी पक्षाकडून प्रयत्न केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल कात्रज संघातील सर्व आजी-माजी संचालक, राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी, मान्यवर नेते यांनी फोन करुन अभिनंदन केल्याची माहिती कात्रज संघाचे वतीने प्र-व्यवस्थापकीय संचालिका डॉ.माधुरी ढमाले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in