वळसे पाटील शिरूरचे पवारसाहेब, तर अशोक पवार आहेत अजितदादा...मग सुप्रियाताई कोण?

अशोक पवार यांनीही पोपटरावांची सूचना ऐकली आणि त्याचे अनुकरण करण्याचीही ग्वाही दिली.
Dilip Walse Patil-Ashok Pawar-papotrao Gawde
Dilip Walse Patil-Ashok Pawar-papotrao GawdeSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरुर तालुका हा शिरुर-हवेली आणि आंबेगाव-शिरुर अशा दोन मतदारसंघात विभागला गेला असला तरी हा तालुका संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. शिरुरचा विचार हा राष्ट्रवादी, शिरुरचे पवारसाहेब आहेत, वळसे-पाटील तर, अजितदादा आहेत आमदार अशोक पवार असे वक्तव्य पाबळ (ता. शिरूर) येथील सभेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याला जोरदार टाळ्यांचा गजर करत उपस्थितांनी प्रतिसाद दिला. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भरव्यासपीठावरच काळेंना छेडत जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर आणि केशरताई पवार यांच्याकडे कटाक्ष टाकून ‘मग यातील सुप्रियाताई सुळे कोण..?’ असा मिश्किल सवाल केला. (Dilip Walse Patil is the Sharad Pawar of Shirur : Ravi Bapu Kale)

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाबळ येथील उपबाजारचे उद्‌घाटन आज (ता. २६ सप्टेंबर) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते, तर शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. शिरुर तालुका हा शिरुर-हवेली आणि आंबेगाव-शिरुर अशा दोन मतदारसंघात विभागला गेला असल्याने अनेक कार्यक्रमांमध्ये तालुक्याचे दोन विभाग स्पष्टपणे जाणवतात.

Dilip Walse Patil-Ashok Pawar-papotrao Gawde
पार्थ पवारांविरोधात मी जनरल डायरसारखा लढलो; पण विधानसभेला माझ्या पाठीशी कोणीही नव्हते

विधानसभा निवडणूक वगळता तालुक्यातील इतर सर्व निवडणुका या संपूर्ण तालुका म्हणून लढल्या जातात. दोन मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद राहू नयेत, यासाठी शिरुरचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच टप्प्यात विषयाला हात घालत पक्षकार्यकर्त्यांना थेट शरद पवार यांच्या विचारांबद्दल सांगितले. शरद पवार यांच्या विचारांशी, त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सार्धम्य असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले नेते दिलीप वळसे पाटील आहेत, असे ते म्हणाले.

Dilip Walse Patil-Ashok Pawar-papotrao Gawde
...तर शिवाजीराव आढळराव पाटील आज लोकसभेत असते!

यावरच ते थांबले नाही तर त्यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखी तडफ आणि कार्यशैली असलेले आपल्या तालुक्याचे अजितदादा म्हणजे आमदार अशोक पवार आहेत. या दोन्ही वाक्यांवर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा गजर केला. या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांनी लगेच व्यासपीठावरील जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर आणि जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार यांच्याकडे कटाक्ष टाकत, ‘मोठे साहेब झाले..., अजितदादा झाले... मग आता या तिघींमधील सुप्रियाताई सुळे कोण,’ असे विचारताच पुन्हा एकदा जोरदार हशा झाला.

अशोकबापू वळसे पाटलांचे मार्गदर्शन घ्या

या भागात विमानतळ येणार, याची कुणकुण लागताच आम्ही बाजार समितीला लागणाऱ्या जागांसाठी या भागात प्रयत्न केल्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी सांगितले. तसेच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करताना त्यांनी आमदार अशोक पवार यांना सल्ला दिला, अशोकबापू तुम्ही वळसे-पाटलांचे मार्गदर्शन घ्या, तुमच्याकडे तसे सगळे गुण आहेतच. तुम्ही वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ठ नेता व्हाल. अर्थात आपल्या भाषणात अशोक पवार यांनीही पोपटरावांची सुचना ऐकली आणि त्याचे अनुकरण करण्याचीही ग्वाही दिली.

भाजपची उमेदवार शोधण्यातच दमछाक होईल

शिरुर-हवेलीत आमदार अशोक पवार यांनी या वेळी तब्बल ४२ हजारांनी भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा पराभव केला. एवढ्या मोठ्या पराभवाने आता शिरुर-हवेलीतील विरोधी पक्षांची म्हणजेच भाजपची सध्याची अशी अवस्था झालेली आहे की, त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधतानच दमछाक होणार आहे. हे वास्तव भाजपवालेही मान्य करतील, अशी स्थिती असल्याचे रवींद्र काळे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com