दिलीप वळसे पाटलांची बाजी : जिल्हा बँकेत पहिले मंत्री बिनविरोध

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) १९९१ पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत...
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse patil) यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. आंबेगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यांच्या गटात ५७ मतदार होते.

या सगळ्या घडामोडींमुळे यंदाच्या हंगामातील बिनविरोध निवडून जाणारे दिलीप वळसे पाटील पहिले मंत्री ठरले आहेत. ते जवळपास १९९१ पासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे देखील जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत

Dilip Walse Patil
पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून मुदत ६ डिसेंबरपर्यंत होती. अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन २२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २३ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून २ जानेवारी २०२२ रोजी मतदान व ४ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Dilip Walse Patil
हर्षवर्धन पाटलांमुळे ताकद वाढलेल्या आप्पासाहेब जगदाळेंनी भरला अर्ज : राष्ट्रवादीच्या डावपेचाकडे लक्ष!

दत्तात्रय भरणे (Dattatrya Bharne) यांनी बुधवारी (ता. १ डिसेंबर) ‘ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील २५ वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत. त्यानंतर अजित पवार यांनीही 'अ' वर्गातून बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकांमार्फत गुरुवारी (ता. २ डिसेंबर) दाखल केले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी ३ डिसेंबरला अर्ज दाखल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com