केंद्रीय तपास यंत्रणा महाआघाडीच्या नेत्यांना या कारणांमुळे त्रास देतात

जो चुकीचा वागला असेल त्याच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

आंबेगाव (जि. पुणे) : राज्याचे बजेट कोरोना महामारी संकट काळात खर्च झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार राज्याचे जीएसटी पैसे आणि इतर मदत द्यायला तयार नाही, अशा परिस्थितीत राज्याचा कारभारात काम करावे लागत आहे. वेळ पडली तर कर्ज काढून राज्यातील समस्या सोडविणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन काहीतरी निमीत्त काढुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करता अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. (Dilip Walse Patil criticizes the central government)

वळसे पाटील मंचर येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. या वेळी ते म्हणाले, कोरोनाचे संकट नियत्रणात आले आहे. मात्र दुसऱ्या बाजुला कारखानदारी, सेवा व्यवसाय, सर्व्हिस सेंटर, शेती, या सर्व क्षेत्रात पिच्छेहाट झाली आहे. या क्षेत्रांना उभारी देण्याचे काम करत असताना केंद्र सरकारने एक कवडीची सुद्धा राज्याला मदत केली, नसल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात आवकाळी पाऊस, चक्रिवादळ, दुष्काळी संकट, या सर्व गोष्टींचा सामना करत शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी वर्गाला मदत देण्याची भूमिका ठेवुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यापासुन केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन काहीतरी निमीत्त काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांना योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करता अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो चुकीचा वागला असेल त्याच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही. मात्र, भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकिय दुष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन राज्यातील सरकार यांच्या डोळ्यात सलतय आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रांचा वापर केला जात, असल्याचे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com