साखर कारखाना म्हणजे गौडबंगाल असे चित्र उभे केले जात आहे

सहकार क्षेत्रावर (Cooperative Sector) अविश्वास निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचे दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी म्हटले आहे.
साखर कारखाना म्हणजे गौडबंगाल असे चित्र उभे केले जात आहे
Dilip Valse PatilSarkkarnama

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. आज त्याच साखर कारखान्याचे नाव काढले की, लगेच काही तरी गौडबंगाल असल्याचे चित्र उभे करुन त्या संस्था आणि क्षेत्राला (Cooperative Sector) बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) केला आहे. ते मंचर येथील नागरी पतसंस्था परिषदेत बोलत होते.

Dilip Valse Patil
राज्य सरकारच्या जाचक अटींमुळे ३० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाच नाही

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यात जसे सहकारात घडले तसायच प्रकार राष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्यामध्ये घडला आहे. यामध्ये पाच ते दहा हजार कोटी रुपये घेऊन कर्ज बुडवली गेली आहेत. मात्र, अशा घटनेत त्या बँकेच्या चेअरमन आणि एमडीला शिक्षा झाल्याचे दिसुन येत नाही. मोठ्या संस्थांना सर्व माफ आणि छोट्या संस्थांमध्ये छोटा जरी प्रकार घडला तरी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा राज्यात कार्यक्रम सुरु असल्याचा गंभीर आरोप पाटलांनी केंद्र सरकारवर केला आहे.

Dilip Valse Patil
'शेतकऱ्यांची पोर म्हणून मिरविणारे, बांधावर जावून शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत'

याबरोबरच केंद्र सरकारच्या माध्यमातुन वित्तीय संस्थांना नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्य़ा उपाययोजना, अडचणी उभ्या केल्या जात आहेत. बँकांवर संचालक मंडळ असतांना नियमाक मंडळ उभे केले जात आहे. एका बाजुला रिझर्व बँक आणि सहकार आयुक्तांचे नियंत्रण आणुन बँकांना पळायला लावयचे आणि पळता आले नाही की, सहकार क्षेत्रावर अविश्वास निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचाही आरोपही वळसे पाटलांनी केला आहे.

हेही वाचा : अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत

अहमदनगर : पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पिंपळनेर येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना एकाच व्यासपीठावर बोलावण्यात आले होते. मात्र अण्णा हजारेंनी या कार्यक्रमाला जाणे टाळले तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राळेगण सिध्दी जवळून जाऊनही अण्णांना भेटणे टाळले. त्यामुळे हा कार्यक्रम आज चर्चेचा विषय ठरला.

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंगगाथा व त्यांच्या राहत्या वाड्याचा जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्याचे आमदार लंके यांनी निश्चित केले होते. त्यासाठीची फलकेही विविध ठिकाणी लावली. तसेच सोशल मीडियावरूनही याची प्रसिद्धी केली. पिंपळनेर हे राळेगणसिध्दी लगतचे गाव आहे, असे असूनही अण्णा हजारे यांनी कार्यक्रमाला येणे टाळले.

या कार्यक्रमाला अजित पवारांसह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ मकाशीर, सरपंच सुभाष गाजरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानचे सर्व पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील नेत्यांवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. शिवाय शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. पवार कुटूंबीय व अण्णा हजारे यांचे संबंध कधीही मधूर राहिलेले नाहीत. हजारेंनी पवार कुटूंबीयांवर नेहमीच टीका केली आहे. त्यामुळे अण्णा हजारे कार्यक्रमाला आले नसल्याची चर्चा आहे. यातच महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनीही राळेगणसिद्धीतून जाऊनही अण्णा हजारेंची भेट टाळणेच पसंत केले आहे. आमदार नीलेश लंके यांचे कार्यकर्ते अण्णा हजारे व अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसणार असे कालपर्यंत ठामपणे सांगत होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in