राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांना तहसीलदारांच्या पतीकडून धमकी...

नवीन तहसीलदार येथे येऊ नयेत म्हणून दहशत करीत आहेत. या उभयतांनी अवैध संपत्ती गोळा केली आहे.
4Mohite_Khed_Final.jpg
4Mohite_Khed_Final.jpg

राजगुरूनगर : खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तहसीलदार आमले पाटील यांच्या पतीपासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार काल खेड पोलिसांकडे दिली आहे. ते वाळू माफिया, भूखंड माफिया आणि माझे राजकीय विरोधक यांच्या सहाय्याने, माझा घातपात करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. ही घटना राजकीय वर्तुळात चर्चचा विषय ठरली आहे.   

खेड तालुक्यातील तलाठी, मंडलाधिकारी यांच्यावर तहसीलदारांचे नियंत्रण नसून, हे कर्मचारी गरीब आणि पीडित जनतेला त्रास देत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या तक्रारी आपणाकडे येतात. भोमाळे, भोरगिरी, पदरवाडी इत्यादी गावांना भूस्खलनाचा धोका आहे. त्यांनी याबाबत उपाययोजना केलेली नाही. गुळाणी गावातील, भगवान गुळाणकर यांनी तहसीलदारांच्या समोर विषप्राशन करून आत्महत्या केली, हे प्रकरणही दाबले गेले, असे आमदारांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबत मोहिते पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.


आपल्या तक्रार अर्जात मोहित पाटील यांनी म्हटले आहे की अनेक कारणांमुळे मी तहसीलदारांविषयी महसूलमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.  विधानसभेत लक्षवेधी सूचना केली. म्हणून त्यांचे पती बाळासाहेब यांनी चिडून मी बदलीचा आग्रह धरू नये, म्हणून माझी बदनामी सुरु केली. तहसीलदारांची बदली केली तर बघून घेईन अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांचे गुंड लोकांशी संबंध आहेत. नवीन तहसीलदार येथे येऊ नयेत म्हणून दहशत करीत आहेत. या उभयतांनी अवैध संपत्ती गोळा केली आहे. ते वाळू माफिया, भूखंड माफिया आणि माझे राजकीय विरोधक यांच्या सहाय्याने, माझा घातपात करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीचा तपास व्हावा.  

तहसीलदार आमले यांचे संरक्षण असल्यामुळे भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांमधून, शासकीय नजराणा न भरता वाळू उपसा केला जातो. सरकारी गायरान आणि औद्योगिक क्षेत्रातून नजराना न भरता, मुरूम उपसाही होतो. कोरोना संकटातही तहसीलदारांनी काम केले नाही. कंपन्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोळा केलेल्या सीएसआर निधीचाही हिशोबही तहसीलदारांकडून दिला जात नाही. दुसऱ्या बाजूला उपचार न मिळाल्याने जनता कोरोनाने बाधित होत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असूनही तहसीलदार समितीची बैठक घेत नाहीत, असा आरोप मोहिते पाटील यांनी केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com